
कुत्रे - कुत्र्यांना त्यांच्या मृत्यूची कल्पना आधीच येते. एवढेच कुत्र्यांना मनुष्यांच्या मृत्यूची देखील चाहुल लागते असे म्हटले जाते. कुत्रे मृत्यूजवळ आला की जेवत नाहीत.

मांजर - मांजराला आठवडाभर आधीच्या त्याच्या मृत्यूची चाहुल लागते. मांजर देखील मृत्यूच्या आधीच अन्न-पाणी सोडून देते आणि एकांतात रहाते.

विंचू - विंचूला देखील त्यांच्या मृत्यूची चाहूल सात दिवस आधीच लागते. तो देखील मृत्यू आधी अन्न खात नाही.

हत्ती - हत्ती सर्वात बुद्धीमान प्राणी म्हणून ओळखला जातो. हत्तींना त्यांच्या मृत्यूची चाहूल आधीच लागत असते.ते अन्न - पाणी सोडून देतात. आणि एकांतात रहायला लागतात. आपला कळप सोडून एकट्याने मृत्यूची वाट पाहात थांबतात.

( डिस्क्लेमर - ही बातमी धार्मिक समजूती आणि चालीरितीवर अलंबून आहे. या बातमीचा उद्देश्य अंधश्रद्धेला खतपाणी घालणे नाही.टीव्ही ९ मराठी या बातमीला दुजोरा देत नाही. )