Deepika And Ranveer : ‘पद्मावत’, ‘बाजीराव मस्तानी’ की ‘रामलीला’… दीपिका-रणवीर सिंहच्या कुठल्या चित्रपटाने सर्वाधिक कमाई केली?

Deepika And Ranveer : दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह आपपाल्या चित्रपटांमुळे चर्चेत आहेत. दीपिकाच्या खात्यात 'किंग'आणि 'राका' हे चित्रपट आहेत. दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह दोघांनी अनेक हिट चित्रपट दिलेत.

| Updated on: Jul 10, 2026 | 2:21 PM
1 / 5
दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह सध्या आपल्या प्रोजेक्ट्समध्ये बिझी आहेत. दीपिकाने आधीच 'किंग'चं शूट कंप्लीट केलं आहे. आता अल्लू अर्जुनच्या 'राका' मध्ये ती काम करणार आहे. दुसरीकडे 'धुरंधर' नंतर रणवीर सिंह सुद्धा चर्चेत आहे.'प्रलय' त्याचा पुढचा चित्रपट आहे. फॅन्सना दोघांच्या पुढच्या चित्रपटाची प्रतिक्षा आहे.

2 / 5
दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह यांनी अनेक चित्रपटात एकत्र काम केलं आहे.  त्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिस वर शानदार परफॉर्म केलं.  लोकांना पुन्हा त्यांना एकत्र पहायचं आहे. दोघांच्या 'पद्मावत', 'बाजीराव मस्तानी' या 'गोलियों की रासलीला राम-लीला' या चित्रपटांना प्रेक्षकांचं खूप प्रेम मिळालं.

3 / 5
सुरुवात 2013 साली आलेल्या 'गोलियों की रासलीला राम-लीला' चित्रपटाने झाली. चित्रपटात दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह एकत्र होते.  संजय लीला भंसाळींचा हा चित्रपट प्रेक्षकांना आवडलेला. 88 कोटींमध्ये बनलेल्या या चित्रपटाने 218 कोटींची कमाई केलेली. हे चित्रपटाचं वर्ल्डवाइड कलेक्शन आहे.

4 / 5
त्यानंतर आला 'बाजीराव मस्तानी'. 2015 साली आलेल्या या चित्रपटाची गाणी सुपरहिट होती. रणवीर सिंह, दीपिका पादुकोण सोबत पुन्हा एकदा प्रियंका चोपडाने काम केलेलं. चित्रपटाचं बजेट 135 कोटी रुपये होतं. प्रत्येकाने जबरदस्त इम्प्रेस केलेलं. जगभरात या चित्रपटाने 357 कोटी रुपयांची कमाई केलेली.

5 / 5
संजय लीला भंसाळींचा  'पद्मावत' 2018 साली आला. यात दीपिका पादुकोणचा नायक शाहिद कपूर होता, तर रणवीर सिंह खलनायकाच्या रोलमध्ये होता. या चित्रपटावरुन बराच वाद झालेला. 215 कोटीमध्ये बनलेल्या या चित्रपटाने जगभरात 585 कोटी रुपयांची कमाई केलेली.

Follow Us