या गोष्टींमुळे सापांना घर, गार्डनकडे होतात आकर्षित, वाढतो मुक्काम; आजच करा सफाई नाहीतर..

सध्या अनेक भागात, रहिवासी क्षेत्रात साप आढळण्याचे प्रमाण वाढले आहे. घराभोवतीची अस्वच्छता, कचरा, कुंड्यांखाली साचलेले पाणी, वाढलेले गवत आणि उघडे डस्टबीन सापांना आकर्षित करतात. परिसर स्वच्छ व नीटनेटका ठेवून तुम्ही सापांना घरात येण्यापासून रोखू शकता.

| Updated on: May 26, 2026 | 1:46 PM
1 / 6
अलिकडच्या काळात रहिवासी भागांमध्ये विषारी साप आढळण्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. खरंतर जंगलात राहणारे साप मानवी वस्त्यांकडे का वळतात, असा प्रश्न अनेकांना पडतो. सर्पतज्ज्ञांच्या मते, घर आणि परिसरातील काही गोष्टी सापांना आकर्षित करतात. विशेषतः  एखादं घर, गार्डन किंवा आवारातील अस्वच्छता आणि ओलसर वातावरणामुळे साप अशा ठिकाणी आश्रय घेतात. यामागची काही प्रमुख कारणं पुढीलप्रमाणे आहेत. ( All Photos : Social Media)

2 / 6
घरातील कचरा आणि अडगळ -  सापांना अंधारी, थंड आणि शांत जागा आवडते. घराच्या कोपऱ्यात पडलेला कचरा, जुनं भंगार सामान किंवा लाकडांचे ढीग हे सापांसाठी लपण्याची सुरक्षित जागा ठरू शकतात. त्यामुळे अशा ठिकाणी साप सहजपणे आश्रय घेतात. त्यामुळे अशा जागा, कोपरे वेळोवेळी स्वच्छ करा.

3 / 6
कुंड्यांखाली साचलेलं पाणी -  घरातील किंवा गार्डनमधील कुंड्यांखाली बरेच जण ताटली किंवा प्लेट ठेवतात, जिथे पाणी साचल्याने ओलावा निर्माण होतो. अशा ओलसर जागांकडे कीटक आणि बेडूक आकर्षित होतात. हे प्राणी सापांचे भक्ष्य असल्याने त्यांच्यामागोमाग सापही त्या परिसरात येतात. त्यामुळे कुंड्यामधील पाणी वेळोवळी साफ करा.

4 / 6
वाढलेलं गवत - गार्डन किंवा लॉनमधील गवत वेळेवर कापलं नाही तर ते सापांसाठी सुरक्षित निवारा बनू शकतं. दाट गवतामध्ये साप सहज लपून राहू शकतात, त्यामुळे अशा जागा त्यांना अधिक अनुकूल वाटतात.

5 / 6
उघडे डस्टबीन आणि उरलेल अन्न  - घराच्या बाहेर किंवा बाल्कनीत उघड्यावर ठेवलेले डस्टबीन, हे उंदीर आणि इतर कीटकांना आकर्षित करतात. आणि हेच प्राणी सापांचं खाद्य असल्यामुळे अन्नाच्या शोधात सापही त्या भागात येऊ शकतात. त्यामुळे कचरा नेहमी झाकून ठेवणं आणि परिसर स्वच्छ राखणं अत्यंत गरजेचं आहे.

6 / 6
( डिस्क्लेमर : या लेखातील सर्व माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. ही प्राथमिक स्वरुपाची आहे. सविस्तर माहितीसाठी किंवा कोणताही प्रयोग करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

Follow Us