Dhamaal 4 OTT: ‘वेलकम टू द जंगल’चा बँड वाजवणारा ‘धमाल 4’ ओटीटीवर कधी अन् कुठे पाहू शकाल?

Dhamaal 4 OTT: अजय देवगणचा 'धमाल 4' हा मल्टिस्टारर कॉमेडी चित्रपट सध्या थिएटरमध्ये अक्षरश: धुमाकूळ घालतोय. अवघ्या चार दिवसांत या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 100 कोटी रुपयांपेक्षा अधिक कमाई केली आहे. थिएटरनंतर हा कोणत्या ओटीटीवर कधी येणार, ते जाणून घ्या..

| Updated on: Jul 15, 2026 | 11:32 AM
1 / 5
अक्षय कुमारच्या 'वेलकम टू द जंगल' या चित्रपटाने जरी काही दिवस बॉक्स ऑफिसवर राज्य केलं असलं तरी आता अजय देवगणच्या 'धमाल 4'ने त्याला ओव्हरटेक केलं आहे. फक्त चार दिवसांत अजय देवगण, रितेश देशमुख आणि अर्शद वारसी यांच्या या कॉमेडी चित्रपटाने जगभरात 102 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे.

2 / 5
'धमाल 4' सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत असताना अनेकजण त्याच्या ओटीटी रिलीजचीही प्रतीक्षा करत आहेत. निर्मात्यांनी अद्याप या चित्रपटाची अधिकृत ओटीटी रिलीजची तारीख जाहीर केली नसली तरी 'धमाल 4' कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर येणार, याबद्दलची माहिती समोर आली आहे.

3 / 5
चित्रपट जेव्हा थिएटरमध्ये सुरू होतो, तेव्हा त्याच्या श्रेयनामावलीत स्ट्रीमिंग पार्टनरचाही उल्लेख आवर्जून असतो. यावरून थिएटरनंतर तो चित्रपट कोणत्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर येईल, हे कळतं. 'धमाल 4'च्या ओटीटी पार्टनर्सच्या क्रेडिट्समध्ये नेटफ्लिक्सचं नाव आहे. म्हणजेच हा चित्रपट नेटफ्लिक्सवर येईल, हे स्पष्ट होतंय.

4 / 5
सर्वसामान्यपणे एखाद्या चित्रपटाची ओटीटी रिलीजची तारीख ही त्याच्या थिएटरमधील परफॉर्मन्सवर अवलंबून असते. अन्यथा सहा ते आठ आठवड्यांमध्ये एखादा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर दाखल होतो. 'धमाल 4' हा चित्रपट ऑगस्टच्या अखेरीस किंवा सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला ओटीटीवर येऊ शकतो.

5 / 5
10 जुलै रोजी प्रदर्शित झालेल्या 'धमाल 4'ने आतापर्यंत भारतात 88.33 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. तर जगभरातील कमाईचा आकडा 102.83 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. या चित्रपटात अजय देवगण, अर्शद वारसी, रितेश देशमुख, जावेद जाफरी, संजीदा शेख, अंजली आनंद, संजय मिश्रा, उपेंद्र लिमये, रवी किशन यांच्या भूमिका आहेत.

Follow Us