Dhurandhar 2: हमजाची क्रेझ इतकी की सोळाव्या दिवशीही तब्बल इतकी कमाई; ‘धुरंधर 2’ची गाडी सुसाट!

रणवीर सिंहचा 'धुरंधर 2' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अद्यापही दमदार कमाई करतोय. शनिवारी या चित्रपटाने किती कोटी रुपये कमावले आणि आतापर्यंत या चित्रपटाची एकूण कमाई किती झाले, याविषयी सविस्तर जाणून घ्या..

| Updated on: Apr 05, 2026 | 8:24 AM
1 / 5
19 मार्च 2026 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झालेल्या 'धुरंधर : द रिव्हेंज' या चित्रपटाच्या कमाईचा वेग इतक्या दिवसांनंतरही मंदावला नाही. आठवड्यातील कुठलाही दिवस असो, अद्याप थिएटरमध्ये या चित्रपटासाठी प्रेक्षकांची गर्दी होत आहे. शनिवारी रणवीर सिंहच्या या चित्रपटाने जबरदस्त कमाई केली.

19 मार्च 2026 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झालेल्या 'धुरंधर : द रिव्हेंज' या चित्रपटाच्या कमाईचा वेग इतक्या दिवसांनंतरही मंदावला नाही. आठवड्यातील कुठलाही दिवस असो, अद्याप थिएटरमध्ये या चित्रपटासाठी प्रेक्षकांची गर्दी होत आहे. शनिवारी रणवीर सिंहच्या या चित्रपटाने जबरदस्त कमाई केली.

2 / 5

'सॅकनिल्क'ने दिलेल्या वृत्तानुसार, 'धुरंधर 2'ने शनिवारी 21.55 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. यासह भारतात या चित्रपटाचं नेट कलेक्शन 959.37 कोटी रुपये, तर ग्रॉस कलेक्शन 1148.58 कोटी रुपये इतकं झालं. 'धुरंधर 2'चा जगभरातील कमाईचा आकडा 1523.58 कोटी रुपयांवर पोहोचला आहे.

3 / 5

पुढील काही दिवस बॉक्स ऑफिसवर कोणताही मोठा चित्रपट प्रदर्शित होणार नसल्याने रणवीरच्या या चित्रपटाकडे कमाईसाठी अजून बराच वेळ आहे. कारण अक्षय कुमारचा 'भूत बंगला' हा चित्रपट 17 एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्यात आला आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत 'धुरंधर 2' हा चित्रपट 'दंगल'चा 2000 कोटींचा रेकॉर्ड मोडणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

4 / 5

'धुरंधर 2'मध्ये हमजा अली मजारीची पार्श्वकथा दाखवण्यात आली आहे. जसकीरत सिंह रंगी हा भारतीय गुप्तहेर बनून पाकिस्तानात का जातो आणि कसा जातो, याची ही कथा आहे. डिसेंबर 2025 मध्ये आदित्य धर दिग्दर्शित या चित्रपटाचा पहिला भाग प्रदर्शित झाला होता.

5 / 5

या चित्रपटात रणवीर सिंह, अर्जुन रामपाल, आर. माधवन, संजय दत्त, सारा अर्जुन, राकेश बेदी, गौरव गेरा, दानिश पंडोर आणि मानव गोहिल यांच्या भूमिका आहेत.

Follow Us