तुच्छ वागणूक देणाऱ्यासोबत..; ‘धुरंधर’ फेम अभिनेत्रीचा ब्रेकअप, पार्टनरबद्दल स्पष्टच म्हणाली..

टेलिव्हिजन असो किंवा बॉलिवूड.. अनेक सेलिब्रिटींचे अफेअर्स आणि ब्रेकअप चर्चेत येत असतात. 'धुरंधर' फेम अभिनेत्री नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिच्या ब्रेकअपविषयी मोकळेपणे व्यक्त झाली. एका काश्मिरी बिझनेसमनला ही अभिनेत्री डेट करत होती.

| Updated on: Jan 18, 2026 | 3:27 PM
1 / 5
'धुरंधर' फेम अभिनेत्रीचा काही महिन्यांपूर्वीच ब्रेकअप झाला. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत या अभिनेत्रीने तिच्या ब्रेकअपमागील कारण सांगितलं आहे. आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर' या चित्रपटातील 'शरारत' या गाण्यात ही अभिनेत्री झळकली होती. हे गाणं तुफान गाजलं आहे.

2 / 5
'फिल्मीबीट'ला दिलेल्या मुलाखतीत क्रिस्टल तिच्या लव्ह लाइफबद्दल मोकळेपणे व्यक्त झाली. "प्रेमाच्या बाबतीत माझ्यासाठी फक्त तीन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. प्रामाणिकपणा, निष्ठा आणि कम्पॅनियनशिप. जर या तीन गोष्टी नसतील तर त्या प्रेमाला काही अर्थ नाही", असं ती म्हणाली.

3 / 5
"आजकाल एकाच व्यक्तीमध्ये हे तिन्ही गुण शोधणं खूप कठीण आहे. परंतु प्रेम तेव्हाच होऊ शकतं जेव्हा या तिन्ही गोष्टी एकत्र येतील. पण सध्याच्या काळात हे शक्य नाही. म्हणून मी अविवाहित आणि खुश आहे. चुकीच्या व्यक्तीसोबत राहण्यापेक्षा मी एकटीच बरी," असं क्रिस्टलने सांगितलं.

4 / 5
पार्टनरविषयी क्रिस्टल पुढे म्हणाली, "मी अशा व्यक्तीसोबत राहू शकत नाही, जो मला खाली खेचेल आणि पुढे जाण्यापासून रोखेल. त्यापेक्षा मी सिंगल राहणं पसंत करेन. मला तुच्छ लेखणाऱ्या व्यक्तीसोबत मी रिलेशनशिपमध्ये राहू शकत नाही."

5 / 5
ऑक्टोबर 2025 मध्ये क्रिस्टलने तिचा बॉयफ्रेंड गुलामसोबत ब्रेकअप केल्याच्या चर्चा होत्या. त्यावेळी क्रिस्टलने तिच्या ब्रेकअपविषयी कोणतीच प्रतिक्रिया दिली नव्हती. परंतु आता क्रिस्टलच्या या वक्तव्याने तिच्या ब्रेकअपच्या चर्चांना आणखी हवा मिळाली आहे.