5 सिनेमे, 3 लग्न, 2 घटस्फोट..; तरुणींच्या गळ्यातील ताईत होता हा अभिनेता, आता 200 कोटींचा मालक

हिंदी सिनेसृष्टीत एक असा हिरो आहे, जो त्याच्या चित्रपटांपेक्षा अधिक खासगी आयुष्यामुळे चर्चेत राहिला आहे. या अभिनेत्याने तीन वेळा लग्न केलं असून दोन वेळा त्याचा घटस्फोट झाला आहे. तिसऱ्यांदा त्याने नव्वदच्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्रीशी लग्न केलं.

| Updated on: Feb 23, 2026 | 10:04 AM
1 / 5
टेलिव्हिजन इंडस्ट्रीत असे अनेक सेलिब्रिटी आहेत, ज्यांनी छोट्या पडद्यावर तर खूप प्रसिद्धी मिळवली, परंतु मोठ्या पडद्यावर ते फ्लॉप ठरले. असाच एक अभिनेता म्हणजे करण सिंह ग्रोवर. 'दिल मिल गए' या मालिकेतून लोकप्रिय ठरलेला करण एकेकाळी तरुणींच्या गळ्यातील ताईत होता.

2 / 5
करण जोहरच्या करिअरची सुरुवात 2004 मध्ये झाली, जेव्हा त्याने एका मॉडेलिंग स्पर्धेत भाग घेतला होता. त्या सिझनमध्ये तो सर्वांत लोकप्रिय मॉडेल ठरला होता. त्यानंतर करणने अनेक ब्रँड्ससोबत जाहिराती शूट केल्या. 'कितनी मस्त है जिंदगी' या मालिकेतून त्याने अभिनयक्षेत्रात पदार्पण केलं.

3 / 5
2008 मध्ये करण 'भ्रम' नावाच्या चित्रपटात झळकला होता. त्यानंतर त्याने बिपाशा बासूसोबत 'अलोन' आणि 'हेट स्टोरी'सारख्या चित्रपटांमध्ये काम केलं. हे तिन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरफ्लॉप ठरले. करणने 2008 मध्ये अभिनेत्री श्रद्धा निगमशी लग्न केलं होतं. परंतु हे नातं फार काळ टिकलं नाही.

4 / 5
श्रद्धाला घटस्फोट दिल्यानंतर करणने 'दिल मिल गए'मधील सहअभिनेत्री जेनिफर विंगेटशी दुसरं लग्न केलं. परंतु हे लग्नसुद्धा अवघ्या दोन वर्षांतच मोडलं. त्यानंतर करणने बिपाशा बासूशी तिसरं लग्न केलं. 'अलोन' या चित्रपटाच्या सेटवर दोघांची भेट झाली होती.

5 / 5
बिपाशा आणि करणने 2016 मध्ये लग्न केलं, तेव्हा ती बॉलिवूडमधील टॉप अभिनेत्री होती. लग्नाच्या सहा वर्षांनंतर तिने मुलगी देवीला जन्म दिला. काही रिपोर्ट्सनुसार, करण सिंह ग्रोवरकडे आज जवळपास 224 कोटी रुपयांची संपत्ती आहे.