दुकानात चक्क 24 कॅरेट सोन्याची मिठाई, किंमत ऐकून व्हाल थक्क !

अमरावतीत दिवाळीनिमित्त एका मिठाईच्या दुकानाने 24 कॅरेट सोन्याच्या वर्खाने सजलेली 'सोनेरी भोग' मिठाई बाजारात आणली आहे. पिस्ता, बदाम, केशर यांसारख्या उच्च दर्जाच्या घटकांनी बनवलेली ही आकर्षक मिठाई ग्राहकांसाठी नवीन आकर्षण ठरली आहे. प्रचंड किंमत असूनही खरेदीसाठी मोठी गर्दी होत आहे. किंमत ऐकून तु्म्हीही थक्क व्हाल.

| Updated on: Oct 18, 2025 | 3:08 PM
1 / 6
अमरावतीमध्ये चक्क 21 हजार रुपये किलो सोन्याची मिठाई.. खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी... दिवाळीच्या निमित्ताने दुकान चालकांनी बनवली मिठाई...

अमरावतीमध्ये चक्क 21 हजार रुपये किलो सोन्याची मिठाई.. खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी... दिवाळीच्या निमित्ताने दुकान चालकांनी बनवली मिठाई...

2 / 6

दिवाळीचा सण आणि गोडधोड पदार्थ यांचं अतूट नातं आहे. मात्र यंदा अमरावतीत एका मिठाईच्या दुकानाने गोडीत सोनेरी भर घातली आहे.

3 / 6

देशभर चर्चेत असलेली सोनेरी भोग मिठाई जी खऱ्या 24 कॅरेट सोन्याच्या वर्खाने सजलेली आहे.

4 / 6

दिवाळीच्या मुहूर्तावर ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी तयार करण्यात आलेली ही मिठाई म्हणजे केवळ खाण्याचा पदार्थ नाही, तर एक कलाकृती आहे.

5 / 6

निवडक आणि उच्च दर्जाच्या सुकामेव्यासह पिस्ता, मामरा बदाम, केशर आणि हेजलनटसारख्या घटकांनी बनवलेली ही मिठाई खास वर्गासाठी आकर्षण ठरली आहे.

6 / 6

या मिठाईची किंमत ऐकून कुणालाही आश्चर्य वाटेल. या एक किलो मिठाईसाठी तब्बल 21 हजार रुपये मोजावे लागत आहे. एवढी महाग मिठाई असूनदेखील खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी होत आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us