Dmart Diwali Shopping : दिवाळीत डि-मार्ट मधून स्वस्तात शॉपिंग कशी करायची? जाणून घ्या सोप्या ट्रिक्स
कालच दसरा झाला आता दिवाळी सारखा मोठा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. अनेक लोक दिवाळीच्या खरेदीसाठी डीमार्टमध्ये जातात, अगदी रोजच्या वापरातील समान, पूजेचे सामान, डिटर्जनच्या गोष्टी, खाऊ सर्वकाही आपण डीमार्टमधून खरेदी करतो. अनेक लोक त्यांचा खर्च कमी व्हावा आणि त्यांना स्वस्त दरात वस्तू खरेदी करता याव्या म्हणून ते डीमार्टमधे जाऊन खरेदी करतात. तुमची दिवाळीची खरेदी कमी खर्चात कशी होईल यासाठी आज आपण काही टिप्स पाहणार आहोत. कोणत्या आहेत त्या टिप्स जाणून घ्यायचं असेल तर पुढील माहिती नक्की वाचा.

बरेच लोक डीमार्टमध्ये जाऊन सामान खरेदी करतात. आणि सणासुदीच्या काळात तिथे खूप गर्दी असते. लोक इथे येऊन सणासाठी लागणाऱ्या सर्व वस्तू एकाच वेळी खरेदी करतात. दसरा सण संपल्यामुळे, सर्वात मोठा सण, दिवाळी, लवकरच येत आहे. हा सण नवीन कपडे घालणे, घरी दिवाळीचे फराळ बनवणे आणि पूजा करणे याच्याशी संबंधित आहे. चला, या सणासुदीच्या काळात दोन हजार रुपयांच्या बजेटमध्ये डीमार्टमधून आवश्यक वस्तू कशा खरेदी कराव्यात यावरील काही टिप्स जाणून घेऊयात.
सामान खरेदी करताना, फक्त घरासाठी आवश्यक असलेल्या वस्तूच घ्या. घरात आधीपासून असलेल्या वस्तू खरेदी करणे टाळा. सणांसाठी आवश्यक असलेल्या वस्तूच खरेदी करा. ऑफर्स आहेत म्हणून अनावश्यक वस्तू खरेदी करणे टाळा. तुम्ही खरेदी करत असलेल्या वस्तू खरोखरच ऑफरमध्ये आहेत की जास्त किंमत दाखवून कमी किमतीत विकल्या जात आहेत, हे सुद्धा तपासा.
महिनाभरासाठी पुरेसे अन्नपदार्थ जसे की तांदूळ, तेल, गव्हाचे पीठच खरेदी करा. कोणतीही वस्तू खरेदी करताना, केवळ एकाच ब्रँडची वस्तू खरेदी करू नका, तर इतर ब्रँड्सच्या किमती देखील तपासा. कारण काही ब्रँड्सवर प्रमोशनल किंवा मोठ्या सवलतीच्या ऑफर्स असतात. यामुळे तुमचे बरेच पैसे वाचू शकतात.
जेव्हा तुम्ही खरेदीला जाल, तेव्हा DMart वेबसाइट किंवा ॲपवर तुमच्या जवळचे स्टोअर निवडा आणि ऑफर्स तपासा. तुमच्या घरासाठी आवश्यक असलेल्या वस्तूंच्या किमती तपासा. कोणत्या वस्तू अर्ध्या किमतीत, एकावर एक (वन प्लस वन) आणि मोठ्या सवलतीत उपलब्ध आहेत, हे तपासा. तुम्हाला आवश्यक असलेल्या वस्तूंची एक यादी तयार करा. यामुळे तुमचा वेळ आणि पैसा दोन्ही वाचेल.
रोजच्या स्वयंपाकासाठी लागणाऱ्या वस्तू खरेदी करण्याचा प्रयत्न करा. म्हणजेच, सर्वात आधी गरजेच्या वस्तूंना प्राधान्य द्या. त्यानंतर साबण आणि डिटर्जंट खरेदी करा. मग पूजेचे साहित्य आणि खाऊ पाहा. गरजेच्या वस्तूंची मोठी पाकिटे खरेदी करण्याऐवजी, महिनाभर पुरतील अशी छोटी पाकिटे खरेदी करा. असे केल्याने तुम्ही २,००० रुपयांच्या बजेटमध्ये खरेदी करू शकता.