डी-मार्टच्या ग्राहकांसाठी मोठी बातमी, किराणा क्षेत्रानंतर आता या क्षेत्रात डी-मार्टची उडी, थेट मिळणार 20% सवलत

गेल्या अनेक वर्षांपासून डी-मार्ट सर्व सामान्य ग्राहकांसाठी स्वस्त दरात घरगुती वस्तू विकत आहे. अशातच डी-मार्टने ग्राहकांसाठी मोठी आनंदाची बातमी दिली आहे. जाणून घ्या सविस्तर

| Updated on: Jul 19, 2026 | 10:23 AM
1 / 5
देशात सध्या सर्वसामान्य ग्राहकांसाठी एकाच ठिकाणी घरगुती आणि दररोजच्या वापरातील वस्तू खरेदी करण्याचे साधन म्हणजे डी-मार्ट आहे. अनेकजण सुट्टीच्या दिवशी आठवड्याभरासाठी डी-मार्टमधून खरेदी करतात.

देशात सध्या सर्वसामान्य ग्राहकांसाठी एकाच ठिकाणी घरगुती आणि दररोजच्या वापरातील वस्तू खरेदी करण्याचे साधन म्हणजे डी-मार्ट आहे. अनेकजण सुट्टीच्या दिवशी आठवड्याभरासाठी डी-मार्टमधून खरेदी करतात.

2 / 5

पण अशातच आता डी-मार्टने त्यांच्या ग्राहकांसाठी मोठी आनंदाची बातमी दिली आहे. ज्यामुळे ग्राहकांना स्वस्त सामान खरेदी करता तर येणारच आहे त्यासोबत डी-मार्टमधून आता औषधांची देखील किरकोळ विक्री करण्यात येणार आहे.

3 / 5

कारण आता डीमार्टने औषधांच्या किरकोळ विक्री क्षेत्रात पाऊल टाकले आहे. स्वस्त दरात किराणा आणि घरगुती वस्तू उपलब्ध करून देणाऱ्या डीमार्टने मुंबई महानगरामधील काही निवडक स्टोअर्समध्ये प्रायोगिक तत्त्वावर फार्मसी काऊंटर सुरू केले असून, ग्राहकांना औषधांवर सरसकट 20 टक्के सवलत दिली जात आहे.

4 / 5

या नव्या उपक्रमाला ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या काही वर्षांत किराणा व्यवसायात झेप्टो, स्विगी इन्स्टामार्ट, ब्लिंकिट, ॲमेझॉन आणि फ्लिपकार्ट यांसारख्या कंपन्यांमुळे स्पर्धा मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

5 / 5

अशा परिस्थितीत डीमार्टची मूळ कंपनी अ‍ॅव्हेन्यू सुपरमार्ट्स आपल्या व्यवसायाचा विस्तार करत नव्या क्षेत्रांमध्ये संधी शोधत आहे. त्याचाच भाग म्हणून कंपनीने फार्मसी व्यवसायात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. डीमार्टने स्वतंत्र मेडिकल स्टोअर्स सुरू करण्याऐवजी आपल्या विद्यमान स्टोअर्समध्येच फार्मसी काऊंटर सुरू करण्याचा मार्ग स्वीकारला आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us