चहा-कॉफीच्या कपलाही असते एक्सपायरी डेट ? या खुणा ठरतात महत्वाच्या, दुर्लक्ष केलं तर..

चहा किंवा कॉफी पिण्यासाठी प्रत्येक घरात कपचा वापर केला जातो. कपचे आकर्षक रंग, विविध डिझाइन्स आणि टिकाऊपणामुळे एकदा खरेदी केलेला कप अनेक वर्षे वापरला जातो. पण कपलाही एक्स्पायरी डेट असेल तर ?

| Updated on: Oct 02, 2026 | 8:05 PM
1 / 8
चहा किंवा कॉफी पिण्यासाठी प्रत्येक घरात कपचा वापर केला जातो. अनेक लोकांना असं वाटतं की कप पूर्णपणे तुटेपर्यंत तो बदलण्याची गरज नाही. मात्र, कपावर काही छोटी खूण किंवा चिन्ह दिसली तर तो कप बदलण्याची वळ आली आहे, हे समजावं. ( All Images Source : iStock)

चहा किंवा कॉफी पिण्यासाठी प्रत्येक घरात कपचा वापर केला जातो. अनेक लोकांना असं वाटतं की कप पूर्णपणे तुटेपर्यंत तो बदलण्याची गरज नाही. मात्र, कपावर काही छोटी खूण किंवा चिन्ह दिसली तर तो कप बदलण्याची वळ आली आहे, हे समजावं. ( All Images Source : iStock)

2 / 8

सतत चहा आणि कॉफी पिल्यामुळे कपाच्या गुणवत्तेवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे बाहेरून चांगला आणि स्वच्छ दिसणारा कप आतूनही तपासणे आवश्यक आहे.

3 / 8

खाद्यपदार्थांप्रमाणे सिरॅमिक कपला काही एक्सपायरी डेट नसते. त्याची योग्य काळजी घेतली, योग्य प्रकारे त्याचा वापर केला आणि स्वच्छता राखली तर ते दीर्घकाळ चांगले राहू शकतात. मात्र, सततचा वापर, गरम पेयं, कप पडणं किंवा धुताना त्याला तडे जाणे यामुळे कप खराब होऊ शकतो. म्हणूनच, फक्त एक्सपायरी डेट नाही असं म्हणून कप अनेक वर्षे वापरत राहणं देखील योग्य नसतं.

4 / 8

कपावर जर अगदी छोटासाही तडा गेला असेल तर त्याचा वापर करू नये. हे छोटे तडे कालांतराने मोठे होऊ शकतात. त्यामुळे त्यात चहा किंवा कॉफी पिताना कप तुटण्याची शक्यता असते.

5 / 8

कपाच्या कडेला, तळाशी किंवा हँडलला कुठेही तडा गेला असेल तर त्याचा वापर करू नये. विशेषतः अशा कपात गरम पेय ओतल्यास तो तुटू शकतो. त्यामुळे हाताला किंवा तोंडाला दुखापत होण्याची शक्यता असते.

6 / 8

7 / 8

कप वारंवार खाली पडणार नाही किंवा कोणत्याही वस्तूवर जास्त घासला जाणार नाही, याचीही काळजी घेणं महत्वाचं ठरतं. तसेच, खूप गरम पेय अचानक कपात ओतणं देखील टाळावं. सामान्यतः सुमारे 6 महिन्यांनंतर कप बदलण्याचा विचार करावा.

8 / 8

(डिस्क्लेमर : वरील लेखात देण्यात आलेली माहिती ही प्राथमिक स्वरूपाची आहे. ती उपलब्ध स्रोतांवरून देण्यात आलेली आहे. टीव्ही 9 मराठी याची पुष्टी करचत नाही.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us