फ्रिजमध्ये 10 मिनिटे चष्मा ठेवल्यास काय होते? कारण ऐकून व्हाल थक्क

महिला फ्रिजचा वापर फक्त पालेभाज्या, दूध आणि थंड पाण्यासाठीच करतात. पण तुम्ही फ्रिजमध्ये 10 मिनिटांसाठी तुमचा चष्मा ठेवला तर होणारे बदल पाहून तुम्ही देखील थक्क व्हाल.

| Updated on: Jul 18, 2026 | 2:46 PM
1 / 5
सोशल मीडियावर सध्या एका अनोख्या घरगुती जुगाडाचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये चष्म्याच्या काचा स्वच्छ करण्यासाठी फ्रिजचा वापर करण्याची वेगळी पद्धत दाखवण्यात आली असून, त्याची जोरदार चर्चा रंगली आहे.

सोशल मीडियावर सध्या एका अनोख्या घरगुती जुगाडाचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये चष्म्याच्या काचा स्वच्छ करण्यासाठी फ्रिजचा वापर करण्याची वेगळी पद्धत दाखवण्यात आली असून, त्याची जोरदार चर्चा रंगली आहे.

2 / 5

व्हिडीओमध्ये एक महिला सर्वप्रथम वापरातील चष्मा फ्रिजच्या फ्रीजरमध्ये सुमारे दहा मिनिटांसाठी ठेवते. त्यानंतर चष्मा बाहेर काढून मऊ व स्वच्छ कापडाने काचा हलक्या हाताने पुसते. तिच्या दाव्यानुसार, यामुळे काचांवरील धूळ, डाग आणि तेलकटपणा सहज निघून जातो आणि चष्म्याच्या काचा अधिक स्वच्छ व चमकदार दिसू लागतात.

3 / 5

हा सोपा उपाय पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले असून, काहींनी तो घरी करून पाहण्याची उत्सुकता दर्शवली आहे. तर काहींनी या उपायाच्या परिणामकारकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

4 / 5

हा व्हिडीओ Avika Rawat Foods या यूट्यूब चॅनेलवर शेअर करण्यात आला असून, लाखो लोकांनी तो पाहिला आहे. कमी खर्चात दैनंदिन समस्यांवर उपाय सांगणारे अशा प्रकारचे घरगुती जुगाड सोशल मीडियावर नेहमीच लोकप्रिय ठरतात.

5 / 5

महत्त्वाची सूचना: ही माहिती सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओवर आधारित आहे. या उपायाची स्वतंत्र वैज्ञानिक किंवा तज्ज्ञांकडून पडताळणी झालेली नाही. त्यामुळे असा कोणताही प्रयोग करण्यापूर्वी माहिती घ्या.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us