‘दृश्यम 3’चा बॉक्स ऑफिसवर ताबा; आठवडाभरात छापल्या इतक्या नोटा

'दृश्यम 3' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करतोय. मोहनलाल यांची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाने गेल्या सात दिवसांत किती कोटी रुपयांची कमाई केली, ते जाणून घ्या..

| Updated on: May 28, 2026 | 2:41 PM
1 / 5
साऊथ सुपरस्टार मोहनलाल यांचा 'दृश्यम 3' हा चित्रपट सध्या प्रेक्षकांचं पूरेपूर मनोरंजन करत आहे. या सस्पेन्स थ्रिलर चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनावर विशेष छाप सोडली आहे. या चित्रपटाच्या सातव्या दिवसाची कमाई पाहून हे सहज स्पष्ट होत आहे. बुधवारी 'दृश्यम 3'च्या प्रदर्शनाला एक आठवडा पूर्ण झाला.

2 / 5
मोहनलाल यांच्या 'दृश्यम 3'ने या संपूर्ण आठवड्यात बॉक्स ऑफिसवर आपलं वर्चस्व कायम ठेवलं आहे. पहिल्या वीकेंडलाच कमाईचा 50 कोटी रुपयांचा टप्पा ओलांडल्यानंतर या चित्रपटाने पुढील तीन दिवसांत 20 कोटींहून अधिक कमाई केली. सातव्या दिवसाच्या कलेक्शनवर नजर टाकल्यास 'दृश्यम 3'ने बुधवारी 6 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे.

3 / 5
'दृश्यम 3'ची आतापर्यंतची एकूण कमाई 73 कोटी रुपयांच्या पुढे गेली आहे. मल्याळम भाषेतील 'दृश्यम 3'च्या यशानंतर अजय देवगणच्या 'दृश्यम 3' हा हिंदी रिमेकसुद्धा हिट होण्याची शक्यता लक्षणीयरित्या वाढली आहे. अजयच्या 'दृश्यम 2'ने बॉक्स ऑफिसवर 230 कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई केली होती.

4 / 5
'दृश्यम 3' या चित्रपटाने पहिल्या दिवशी 15.85 कोटी रुपये, दुसऱ्या दिवशी 11.05 कोटी रुपये, तिसऱ्या दिवशी 13.70 कोटी रुपये, चौथ्या दिवशी 13.85 कोटी रुपये, पाचव्या दिवशी 7.70 कोटी रुपये, सहाव्या दिवशी 6.50 कोटी रुपये आणि सातव्या दिवशी 6 कोटी रुपये कमावले आहेत.

5 / 5
'दृश्यम 3' हा सस्पेन्स थ्रिलर चित्रपट येत्या वीकेंडपर्यंत कमाईचा 100 कोटी रुपयांचा टप्पा सहज पार करेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. साऊथपासून हिंदी फिल्म इंडस्ट्रीपर्यंत 'दृश्यम' या सस्पेन्स थ्रिलर चित्रपटाच्या फ्रँचाइजीने धुमाकूळ घातला आहे. 2013 मध्ये सर्वांत आधी मल्याळम भाषेत 'दृश्यम' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us