मोठी बातमी! या जिल्ह्यात अचानक जमीन हादरली, भूकंपाच्या धक्क्यांमुळे भीतीचे वातावरण!

Earthquake in Maharashtra : राज्यातील हिंगोली भागात गेल्या काही दिवसांपासून भूकंपाचे धक्के जाणवत आहेत, आज या भागात 3.6 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला. याची माहिती जाणून घेऊयात.

बापू गायकवाड | Updated on: May 12, 2026 | 10:08 PM
1 / 5
गेल्या काही दिवसांपासून हिंगोली जिल्ह्याला भूकंपाचे धक्के बसत आहे. आज सायंकाळी हिंगोली जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. त्यामुळे नागरिक भयभीत झाले आहे.

गेल्या काही दिवसांपासून हिंगोली जिल्ह्याला भूकंपाचे धक्के बसत आहे. आज सायंकाळी हिंगोली जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. त्यामुळे नागरिक भयभीत झाले आहे.

2 / 5

हिंगोली जिल्ह्यात आज सायंकाळी जाणवलेल्या भूकंपाच्या धक्क्याची तीव्रता 3.6 रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली आहे. या धक्क्यांमुळे काही काळ नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

3 / 5

समोर आलेल्या माहितीनुसार हिंगोली जिल्ह्यातील अनेक गावात दुपारपासून सौम्य भूकंपाचे धक्के जाणवत आहेत. सर्वाधिक धक्के वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे गाव परिसरात जाणवले.

4 / 5

काही दिवसांपूर्वीच 4.7 रीक्टर स्केलच्या भूकंपामुळे वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे गावात घराला गेले तडे गेले होते. याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते.

5 / 5

हिंगोली जिल्ह्यात आज जाणवलेल्या भूकंपाच्या धक्क्यामुळे कोणतीही जीवितहाणी झाल्याचे वृत्त नाही. मात्र वारंवार जाणवणाऱ्या या धक्क्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us