Vaibhav Mangale : मार्केटिंग आणि पैसे काढायचे धंदे…वैभव मांगलेंची संतप्त पोस्ट, काय घडलं?
लोकप्रिय अभिनेते वैभव मांगले यांनी सोशल मीडियावर केलेल्या एका पोस्टची सध्या चर्चा रंगली आहे. त्यांच्या या पोस्टमागचं नेमकं कारण काय? जाणून घ्या सविस्तर.

मराठी मनोरंजनविश्वातील लोकप्रिय अभिनेते वैभव मांगले यांनी डाएट आणि फिटनेसच्या नावाखाली सुरू असलेल्या मार्केटिंगवर परखड मत मांडलं आहे. वजन कमी करण्याच्या स्वतःच्या अनुभवातून त्यांनी पारंपरिक आहार, योग्य प्रमाण आणि खाण्याच्या सवयींचं महत्त्व अधोरेखित केलं आहे.
वजन कमी करण्यासाठी विविध डाएट पद्धतींचा अनुभव घेतल्यानंतर वैभव मांगले यांनी सोशल मीडियावर आपले विचार व्यक्त केले. महागड्या डाएट प्लॅनपेक्षा संतुलित आहार आणि योग्य जीवनशैलीकडे लक्ष देण्याची गरज त्याच्या पोस्टमधून दिसून येते.
आजच्या काळात फिटनेसच्या नावाखाली अनेक खाद्यपदार्थ आणि डाएट पद्धतींची जाहिरात केली जाते. याच पार्श्वभूमीवर वैभव मांगले यांनी अशा मार्केटिंगवर टीका करत आपल्या पोस्टमधून अनुभवाधारित मत मांडलं आहे.
आपल्या पोस्टमध्ये वैभव मांगले यांनी पारंपरिक अन्न खाणं आणि आहाराचं प्रमाण सांभाळणं यावर भर दिला आहे. त्यांच्या मते, वजन कमी करण्याच्या प्रयत्नात अनेक पर्यायांचा विचार करण्यापेक्षा रोजच्या खाण्यापिण्याच्या सवयींकडे लक्ष देणं महत्त्वाचं आहे.
वैभव मांगलेंच्या या पोस्टला सोशल मीडियावर चाहत्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. अनेकांनी त्याच्या विचारांशी सहमती दर्शवत ‘एकदम बरोबर’ आणि ‘खरंच आहे’ अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत.
वैभव मांगले सध्या ‘एकदा पाहावं करून’ या नाटकातून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. मराठी नाटक, चित्रपट आणि मालिकांमधील आपल्या भूमिकांमुळे लोकप्रिय असलेल्या वैभवच्या बदललेल्या लूकचीही चाहत्यांमध्ये चर्चा होत आहे.