EPFO : खासगी नोकरदारांसाठी दिवाळीआधी गोड बातमी! महिन्याला मिळणार 7500 रुपये पेन्शन?
EPFO : खासगी नोकरदारांसाठी दिवाळीआधी गोड बातमी हाती आली आहे. महिन्याला 7500 रुपये पेन्शन मिळण्याबाबत पुढील महिन्यात बैठक होणार आहे.

कर्मचारी भविष्य निधी संघटनेच्या निवृत्ती वेतनधारकांसाठी मोठी बातमी हाती आलीये. या योजनेअंतर्गत किमान मासिक पेन्शन वाढवण्यावर चर्चा होण्याची शक्यता आहे.
सध्या किमान पेन्शन दरमहा 1000 रुपये इतकी आहे. परंतु ही पेन्शन 75000 रुपयांपर्यंत वाढवण्याची मागणी संघटनांकडून केली जात आहे. परंतु याबाबत पेन्शन वाढवण्याबाबत अंतिम निर्णय झालेला नाही.
ईपीएफओच्या पेन्शनबाबत दिल्लीऐवजी गुजरातच्या गीरमध्ये बैठक होण्याची शक्यता आहे. या बैठकीत पेन्शन वाढवण्यावर चर्चा होण्याची शक्यता आहे
ईपीएफओ पेन्शनबाबत 19 नोव्हेंबर 2026 रोजी पहिल्यांदा बैठक आयोजित केली जाईल. याआधी नवी दिल्लीत पाच बैठका झाल्या होत्या.
निवृत्त वेतधारकांच्या संघटना आणि कामगार संघटना सातत्याने पेन्शनमध्ये वाढ करण्याची मागणी करत आहे. पेन्शनची रक्कम वाढवण्याची चर्चा सुरू झाल्याने खासगी कर्मचाऱ्यांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत.