Ashwini Gorle : ‘तारिणी’ फेम प्रसिद्धी अभिनेत्रीकडून पैठणीचा अपमान, मानाच्या साडीसोबत जे केलं त्यावर नेटकऱ्यांचा संताप
Ashwini Gorle : मराठमोळी अभिनेत्री अश्विनी गोरले हिचे काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यावर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केलं आहे. व्हिडीओवर अनेक नेटकऱ्यांनी अभिनेत्रीच्या विरोधात कमेंट देखील केल्या आहे.

Ashwini Gorle : 'तारिणी' मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री अश्विनी गोरले हिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. मालिकेतील तिच्या भूमिकेला चाहत्यांनी डोक्यावर उचलून घेतलं.
'तारिणी' मालिकेल अश्विनी गोरले हिने काव्या ही भूमिका साकारली आहे. पण आता अश्विनी तिच्या भूमिकेमुळे नाही तर, कपड्यांमुळे चर्चेत आली आहे. पैठणीच्या साडीपासून अभिनेत्री वेगळा लूक केलेला.
सांगायचं झालं तर, नुकताच ‘झी मराठी अवॉर्ड्स 2026’ चा दिमाखदार सोहळा पार पाडला यावेळ अश्विनी हिने देखील हजेरी लावलेली. पण अनेकांना अभिनेत्रीचा लूक आवडलेला नाही. अनेकांनी तिच्या लुकवर संताप व्यक्त केला आहे.
एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, 'सडीची वाट लावली', दुसरा नेटकरी म्हणाला, 'फालतू दिसतेय काहीही घालायचं म्हणून घातलं आहे...', तिसरा नेटकरी म्हणाला, 'किळश आली पाहून...', 'अगं बाई हिच पैठणी नेसली असती तर किती छान लूक आला असता...', असं देखील अनेक नेटकरी म्हणाले आहेत.
अश्विनी हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्री मराठी इंडस्ट्रीमध्ये सध्या स्वतःचं नाव मोठं करत आहे. पण सोशल मीडियावर अभिनेत्री कामय सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या फॉलोअर्सची संख्या 3 हजार 895 आहे, ती फक्त 970 लोकांना फॉलो करतेच