शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, पीएम किसानचे पैसे पाहिजेत असतील तर आताच करा हे काम, मोठी अपडेट

PM Kisan Samman Nidhi Yojana News : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. तब्बल दोन हजार रूपये शेतकऱ्यांच्या खातात जमा होणार आहेत. त्यातच आता मोठी अपडेट पुढे येतंय.

| Updated on: Oct 10, 2026 | 8:25 PM
1 / 5
 प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना देशभरातील लाखो लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी फायदेशीर आहे. केंद्र सरकार दरवर्षी 6000 रूपयांची अर्थिक मदत तीन समान हप्तांमध्ये शेतकऱ्यांना देते.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना देशभरातील लाखो लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी फायदेशीर आहे. केंद्र सरकार दरवर्षी 6000 रूपयांची अर्थिक मदत तीन समान हप्तांमध्ये शेतकऱ्यांना देते.

2 / 5

ही रक्कम सरकार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात देते. सरकारने 20 जून 2026 रोजी 23 वा हप्ता शेतकऱ्यांना दिला. कृषी विभागाच्या माहितीनुसार, 24 वा हप्ता चालू ऑक्टोबर महिन्यात वितरित होण्याची शक्यता आहे.

3 / 5

हा हप्ता मिळण्यापूर्वी काही महत्वाची कामे करणे महत्वपूर्ण आहे. लाभार्थ्यांसाठी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य करण्यात आले आहे.

4 / 5

ई-केवायसी केल्याशिवाय शेतकऱ्यांना हप्ता मिळणार नाही. त्याशिवाय शेतकऱ्यांना 24 वा हप्ता मिळणार नाही. सरकार लाभार्थ्यांना थेट लाभ देण्यासाठी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरचा वापर करते.

5 / 5

यावर्षी पीएम किसान पोर्टलवरील लाभार्थ्यांच्या एक मोठा बदल दिसून आला आहे, ज्यामध्ये शेतकरी आयडीसाठी एक नवीन रकाना जोडण्यात आला आहे. केवायसी केल्याशिवाय शेतकऱ्यांसाठी पर्याय नाही.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us