Dasara 2026 : सोने, गाडी खरेदी करण्याची उद्या कोणती वेळ शुभ, जाणून घ्या दसऱ्याच्या पूजेचा वेळ..
Dasara 2026 : उद्या दसरा आहे. दुसरा हा सर्वात मोठा सण आहे. यादिवशी शुभ गोष्टींची सुरूवात आपण करू शकतो. सोने आणि गाडीची खरेदी करण्यासाठी हा दिवस सर्वात चांगला ठरतो.

उद्या 20 ऑक्टोबर 2026 रोजी विजयादशमी आहे. विजयादशमी दसरा म्हणून साजरा केली जाते. साडेतीन मुहूंतांपैकी एक विजयादशमी मानली जाते. या दिवशी नवीन काम सुरू करणे शुभ मानले जाते.
पंचांगानुसार, दशमी तिथी उद्या 20 ऑक्टोबर रोजी दुपारी 2 वाजून 11 मिनिटांपर्यंत राहणार आहे. उद्या महत्वाचा मुहूर्त हा विजय मुहूर्त असतो. हा मुहूर्त दुपारी 1 वाजून 59 मिनिटे ते 2 वाजून 45 मिनिटे राहणार आहे.
यावेळी पूजा, शस्त्र पूजा आणि शमी पूजा केली जाते. विजय मुहूर्तावर केलेली पूजा ही शुभ मानली जाते. मुंबई आणि पुण्यात विजय मुहू्र्त हा दुपारी 2 वाजून 16 मिनिटे ते 3 वाजून 6 मिनिटांपर्यंत असेल.
दसऱ्याला सोने खरेदी सर्वात शुभ मानली जाते. आपण दिवसभरात कधीही सोन्याची खरेदी करू शकता. त्यातच तुम्ही विजय मुहूर्तात म्हणजेच दुपारी 2 ते 3 दरम्यान सोने, चांदी खरेदी करू शकता.
या मुहूर्तावर गाडी खरेदी केली तर मोठी बरकत राहते. नवीन व्यवसायही या मुहूर्तावर सुरू केला तर सुरूवात चांगली आणि यशस्वी ठरेल.