Railway Blanket : रेल्वेतून ब्लँकेट घरी नेण्याची चूक कधीच करू नका, पोलीस शोध घेऊन…कायद्यात नेमकी शिक्षा काय?

स्लीपर एसी कोचमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना प्रवासाचा त्रास होऊ नये म्हणून रेल्वे विभागाकडून अंगावर घेण्यासाठी तसेच सिटवर पांघरण्यासाठी ब्लँकेट दिली जाते. परंतु अनेक प्रवासी हे ब्लँकेट चोरून घरी घेऊन जातात.

| Updated on: Jul 13, 2026 | 9:02 PM
1 / 5
प्रवाशांना आपला प्रवास सुखकर व्हावा यासाठी भारतीय रेल्वे खात्याकडून वेगवेगळ्या स्वरुपाची काळजी घेतली जाते. जे प्रवासी रेल्वेच्या एसी कोचमधून प्रवास करतात त्यांच्यासाठी तर विशेष सुविधा असतात.

प्रवाशांना आपला प्रवास सुखकर व्हावा यासाठी भारतीय रेल्वे खात्याकडून वेगवेगळ्या स्वरुपाची काळजी घेतली जाते. जे प्रवासी रेल्वेच्या एसी कोचमधून प्रवास करतात त्यांच्यासाठी तर विशेष सुविधा असतात.

2 / 5

स्लीपर एसी कोचमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना प्रवासाचा त्रास होऊ नये म्हणून रेल्वे विभागाकडून अंगावर घेण्यासाठी तसेच सिटवर पांघरण्यासाठी ब्लँकेट दिली जाते. परंतु अनेक प्रवासी हे ब्लँकेट चोरून घरी घेऊन जातात.

3 / 5

परंतु रेल्वेतील ब्लँकेट घरी घेऊन जाणे हा कायद्यानुसार गुन्हा आहे. अशी चोरी करताना पकडले गेल्यास प्रवाशावर रेल्वे प्रॉपर्टी अॅक्ट 1996 नुसार कारवाई केली जाते. तसेच काही आर्थिक स्वरुपाचा दंडही आकारला जाऊ शकतो.

4 / 5

रेल्वेतून सामान चोरून नेल्यास आणि तुम्हाला रेल्वे पोलीस किंवा रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी पकडल्यास तुम्हाला एक हजार रुपयांपर्यंतचा दंड होऊ शकतो. तसेच दुसऱ्यांदा तुम्हाला चोरी करताना पकडल्यास तुम्हाला पाच वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकते.

5 / 5

दुसऱ्यांदा चोरी करताना पकडल्यास तुम्हाला आर्थिक दंडही वसूल केला जातो. 2018 साली रेल्वेमध्ये होणाऱ्या अशा चोऱ्यांचा एक रिपोर्ट समोर आला होता. या रिपोर्टनुसार तब्बल 7 हजार ब्लँकेट आणि 81 हजार बेडशीट चोरीला गेले होते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us