ऐन दिवाळीत महागाईचा शॉक लागणार! जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती गगनाला भिडणार; कोणत्या वस्तू महागणार?
सर्वसामान्यांना ऐन दिवाळीत महागाईचा शॉक लागण्याची शक्यता आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती गगनाला भिडण्याची शक्यता आहे.

सर्वसामान्यांना पुन्हा महागाईचा झटका लागणार आहे. कच्चा तेल पुरवठा आणि पुरवठा साखळीत अडथळा निर्माण झालं आहे. एफएमसीजी कंपन्यांच्या कच्चा माल 74 टक्क्यापंर्यत महाग झाला आहे.
येत्या दिवसांत महागाईचा परिणाम हा कंपन्याच्या नफ्यावर आणि दैनंदिन वस्तूंच्या किमतींवर होईल,असा अहवाल समोर आला आहे.
साबण, टूथपेस्ट, चॉकलेट, खाद्यतेल, चहा, बिस्किटे यांसारख्या दररोज लागणार्या वस्तू महागण्याची शक्यता आहे. कच्चा मालाचा भाव वाढल्याने कंपन्या उत्पादनांच्या किंमती वाढवण्याच्या तयारीत आहे.
जगासहित देशातही कच्चा मालाचा भाव वाढला आहे. कंपन्यांना लागणारा कच्चा माल हा 74 टक्क्यांपर्यंत महागला आहे. ट्रक भाडे ही 13 टक्क्यांपर्यंत झाली आहे. तर खाद्य तेलाच्या किमतीत 9.4 टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे.
कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल 113 डॉलरपर्यंत वाढलाय. त्यामुळे अन्न आणि दैनंदिन गरजेच्या वस्तूंच्या किमती लक्षणीयरीत्या वाढल्यात