इंदाैरी पोहे घरी तयार करायचे आहेत? मग खास या टिप्स फॉलो करा आणि तयार करा गरमा गरम पोहे  

सकाळी नाश्त्यात काय बनवायचे म्हटले की, सर्वांना दिसतात ते म्हणजे पोहे. पोहे जवळपास प्रत्येक घरात तयार केली जातात. पोहे तयार करण्याच्या वेगवेगळ्याच पद्धती आहेत. त्यामध्ये इंदाैरी पोहे अधिक फेमस आहेत.

Updated on: Oct 01, 2025 | 10:00 AM
1 / 5
भारतात नाश्त्यासाठी सर्वात फेमस पदार्थ म्हणजे पोहे आहेत. पोहे अनेक प्रकारे तयार केली जातात. त्यामध्येही सर्वात खास पोहे म्हणून लोकांची पसंत इंदाैरी पोह्याला आहे. इंदाैरी पोहे खास पद्धतीने तयार केली जातात. चला तर इंदाैरी पोह्यांची रेसिपी जाणून घेऊयात. 

2 / 5
इंदाैरी पोहे बनवण्यासाठी तुम्हाला पोहे, चिरलेल्या मिरची, जिरे, मोहरी, हळद, तेल, साखर, मीठ, बारीक चिरलेला कांदा, शेव, मसाला बुंदी, लिंबू इत्यादी गोष्टी लागतील. 

3 / 5
 इंदाैरी पोहे बनवण्यासाठी सर्वात अगोदर पोहे स्वच्छ धुवून घ्या. सर्व पाणी काढून टाका आणि थोडा वेळ राहू द्या. नंतर हळद, साखर आणि मीठ घाला आणि चांगले मिसळा. आता एका पॅनमध्ये तेल गरम करा. मोहरी, हिरव्या मिरच्या आणि जिरे घाला.

4 / 5
मसाला घाला आणि गॅस कमी करा. आता एका मोठ्या पॅनमध्ये पाणी उकळवा आणि उकळत्या पाण्यावर एका भांड्यात पोहे ठेवा आणि वाफ येऊ द्या.

5 / 5
पोहे सात मिनिटे वाफवले की त्यावर हिरवी कोथिंबीर घाला. आता गरम गरम पोहे एका प्लेटमध्ये घ्या आणि शेव, बुंदी, चिरलेला कांदा आणि लिंबू घालून मस्त खा. 