कुवेतचा पाकिस्तानला जोरदार धक्का, संरक्षण करारानंतर घेतला मोठा निर्णय, थेट भारतात..
पाकिस्तान आणि कुवेतने मोठा संरक्षण करार केला. या करारानंतर काही वेळातच मोठा धक्का पाकिस्तानला मोठा धक्का कुवेतने दिला. पाकिस्तानने ज्याचा विचार केला नाही, तेच घडताना दिसतंय.

कुवेत पाकिस्तान यांच्यात संरक्षण करार झाला. या कराराने भारतासाठी मोठा धोका निर्माण झाल्याचे सांगितले जाते. गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तान अनेक देशांसोबत संरक्षण करार करताना दिसत आहे.

हा करार झाल्यानंतर एका दिवसानंतर पाकिस्तानला कुवेतने दणका दिला. कुवेतने आपल्या उच्चस्तरीय प्रतिनिधिमंडळाला नवी दिल्लीत पाठवले. संयुक्त रक्षा समितीच्या बैठकीसाठी पाठवले आहे.

ज्यात सैन्य प्रशिक्षण, संयुक्त युद्धाअभ्यास, रक्षा उद्योग आणि अनुसंधान या विषयावर चर्चा होईल. दोन्ही देश संरक्षणाच्या मुद्द्यात एकत्र येऊन काम करतील.

संयुक्त रक्षा समिती पहिल्या बैठकीत भारत आणि कुवेत यांच्यातील संरक्षण विषयावर चर्चा करेल. हा पाकिस्तानला मोठा दणका आहे. कुवेतसोबत रक्षा करार करण्यापूर्वी त्यांना मोठा झटका बसला.

भारतासोबत महत्वपूर्ण बैठकीपूर्वी एक दिवस अगोदर कुवेतने पाकिस्तानसोबत रक्षा करारावर सही केली. त्यानंतर तात्काळ त्यांचे एक शिष्टमंडळ भारतात दाखल झाले.