गोळीबारानंतर टायगर श्रॉफ याचे धक्कादायक फोटो पुढे, छातीसह हातावर जखमा, एकनाथ शिंदे यांनी..
बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ याच्यावर मुंबईतील भर रस्त्यावर गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात अभिनेता जखमी झाला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे टायगर श्रॉफच्या भेटीला पोहोचले होते. यादरम्यान त्याचे फोटो पुढे आले.

बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ याच्या गाडीवर मोठा हल्ला झाला. या हल्ल्याने एकच खळबळ उडाली. जुहू परिसरात गोळीबार करण्यात आला. अभिनेता फुटबॉल मॅच खेळून घरी जात असताना हा हल्ला झाला.
तीन हल्लेखोरांनी हा हल्ला केल्याची माहिती आहे. काही व्हिडीओमध्ये गोळीबार करताना हे हल्लेखोर स्पष्ट दिसत आहेत. अभिनेत्यासह दोन जण जखमी झाले आहेत.
या हल्ल्याची जबाबदारी लॉरेन्स बिश्मोई गॅंगने स्वीकारली आहे. तशी पोस्टही सोशल मीडियावर शेअर करण्यात आली. त्यातच राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे टायगर श्रॉफ याच्या भेटीला पोहोचले.
एकनाथ शिंदे यांनी टायगर श्रॉफच्या घरी जाऊन त्याची भेट घेतली. यावेळी टायगर श्रॉफ हा देखील सोप्यावर बसलेला दिसत आहे. टायगर श्रॉफ जखमी झाले नसल्याचे मुंबई पोलिसांकडून सांगितले जात होते.
पण एकनाथ शिंदे यांच्यासमोर टायगर श्रॉफ बसलेला दिसत असून त्याच्या शरीराला मार लागलेला दिसत आहे. काही जखमा टायगर श्रॉफ याला झाल्याचे स्पष्ट दिसत आहे.