फॉरेनचा पॅराग्लायडर भरकटला, साताऱ्यातून थेट पुण्यात पोहोचला; पुढे घडलं असं काही की…

पॅराग्लायडिंग वर्ल्डकप स्पर्धेतील परदेशी पॅराग्लायडिंग स्पर्धकाच्या पॅराशूटचे पुण्याच्या भोर तालुक्यातील रावडी गावात अचानक लँडिंग झाल्याचे पाहायला मिळाले. पाचगणी येथून हवेत झेप घेऊन उडाल्यानंतर वातावरणात बदल झाल्याने तो पाचगणीत पोहोचला.

| Updated on: Feb 21, 2026 | 7:24 PM
1 / 6
महाबळेश्वरमधील पाचगणी येथे सुरू असलेल्या पॅराग्लायडिंग वर्ल्डकप स्पर्धेतील परदेशी पॅराग्लायडिंग स्पर्धकाच्या पॅराशूटचे पुण्याच्या भोर तालुक्यातील रावडी गावात अचानक लँडिंग झाल्याचे पाहायला मिळाले. पाचगणी येथून हवेत झेप घेऊन उडाल्यानंतर वातावरणात बदल झाल्याने हा पॅराग्लायडर थेट पुण्यातील भोर तालुक्यात जाऊन पोहोचला.

महाबळेश्वरमधील पाचगणी येथे सुरू असलेल्या पॅराग्लायडिंग वर्ल्डकप स्पर्धेतील परदेशी पॅराग्लायडिंग स्पर्धकाच्या पॅराशूटचे पुण्याच्या भोर तालुक्यातील रावडी गावात अचानक लँडिंग झाल्याचे पाहायला मिळाले. पाचगणी येथून हवेत झेप घेऊन उडाल्यानंतर वातावरणात बदल झाल्याने हा पॅराग्लायडर थेट पुण्यातील भोर तालुक्यात जाऊन पोहोचला.

2 / 6

मिळालेल्या माहितीनुसार हा पॅराग्लायडर पोलंड देशातील असून त्याचे नाव क्रिझस्टोफ मार्टिन असे आहे. हा पॅराग्लायडर हवेत भरकटून भोर तालुक्यात पोहोचला आणि रावडी गावातील शेताच्या एका मोकळ्या जागेत तो उतरला.

3 / 6

हे पाहिल्यानंतर औत्सुक्याने गावातील तरुणांनी त्या ठिकाणी धाव घेतली. त्यानंतर मार्टिन याच्याशी संवाद साधल्यानंतर तो पाचगणी येथून भरकटून भोर येथे पोहोचल्याचे तरुणांच्या लक्षात आले. त्यानंतर तरुणांनी इंटरनेटवरून स्पर्धेच्या ठिकाणचा दुरध्वनी क्रमांक मिळवला.

4 / 6

स्पर्धेच्या आयोजकांशी संपर्क साधला. त्यानंतर तीन तासांच्या कालावधीनंतर स्पर्धेच्या ठिकाणाहून आलेल्या वाहनातून मार्टीन पाचगणीकडे रवाना झाला. अशा प्रकारे स्पर्धकाला मदत करीत गावातील तरुणांनी त्याला स्पर्धेठिकाणी सुखरूप पोहचविले. शुक्रवारी (20 फेब्रुवारी) दुपारी ही घटना घडली

5 / 6

मात्र या सर्व घटने दरम्यान मार्टीनने गावातील तरुणांशी चांगल्याच गप्पा मारल्या. स्थानिक तरुणांनीही जमेल तसे तोडके मोडके इंग्लिश बोलून या परदेशी स्पर्धकाशी गप्पा मारून त्याला धीर दिला. त्याने स्थानिकांनी दिलेली बर्फी खाल्ली.

6 / 6

त्यानंतर स्थानिक शिवभक्तांच्या सोबतीने छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणा परदेशी मार्टीनने या वेळी दिल्या. पाचगणीला जाण्यापूर्वी त्याने तरुणांनी आणि ग्रामस्थांनी केलेली मदत, दिलेल्या प्रेमळ वागणुकीचे कौतुक करून सर्वांचे आभार मानले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us