वृत्तपत्रात समोसा, वडापाव दिल्यास थेट जेलमध्ये, FSSAI चा मोठा इशारा, आता..

जवळपास सर्वजण वडापाव, चाट, भेळ, समोसा कागदावर घेऊन खातात. विक्रेत्यांकडून वृत्तपत्रात या गोष्टी दिल्या जातात. मात्र, आता जर ही चूक केली तर थेट जेलमध्ये जाण्याची वेळ येऊ शकते. याबाबत नुकताच मोठी कारवाई देखील करम्यात आली.

| Updated on: Jun 06, 2026 | 6:07 PM
1 / 5
ऑफिसमधून बाहेर निघताना किंवा बाजारात फिरत असताना बऱ्यापैकी लोक रस्त्याच्या बाजूला उभे राहून वर्तमानपत्रात वडापाव समोसा, ब्रेड पकोडा, भजी किंवा चाट खातात. जर तुमचीही ही सवय असेल तर ताबडतोब ही सवय बदला.ही छोटीशी चूक अंगलट येऊ शकते.  गंभीर आजारी तुम्ही पडू शकता.

2 / 5

भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरण (FSSAI), ने आता या मुद्द्यावर कठोर भूमिका घेतली आहे. FSSAI ने रेस्टॉरंट मालक,रस्त्यावरील खाद्य विक्रेते,लहान मोठे दुकानदार आणि केटरर्स यांना तात्काळ अन्न वर्तमानपत्र न देण्याचा आदेश दिला.

3 / 5

यासोबतच मोठा इशारा देण्यात आला. याबाबत मुंबईमधील प्रसिद्ध वडापाव विक्रेत्यावर कारवाईही झाली. वृत्तपत्र छपाईमध्ये वापरल्या जाणाऱ्या शाईमध्ये विविध धोकादायक रसायने, विषारी धातू असतात.

4 / 5

जेव्हा वृत्तपत्रावर गरम किंवा तेलकट पदार्थ ठेवला जातो, तेव्हा शाई वितळते आणि थेट पदार्थाला चिकटते.ज्याने तो पदार्थ विषारी होतो.

5 / 5

वर्तमानपत्रात अन्न न देणे हा नवीन नियम नाही. अन्न सुरक्षा आणि मानके विनियम 2018 नुसार हे पूर्णपणे प्रतिबंधित आणि बेकायदेशीर आहे.प्रत्यक्ष व्यवहारात याचे पालन होत नसल्यामुळे थेट कारवाही होऊ शकते. जेलमध्ये जाण्याचीही शक्यता आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us