गौतमी पाटील-भाऊ कदमची जोडी तुफान हिट; युट्यूबवर ट्रेंड होतंय ‘हिल पोरी हिला’ गाणं

नृत्यांगना गौतमी पाटील आणि अभिनेते भाऊ कदम यांची जोडी युट्यूबवर तुफान हिट ठरतेय. या दोघांचं 'हिल पोरी हिला' हे नवीन गाणं अनेकांच्या पसंतीस उतरलं असून युट्यूबवर आता हे गाणं ट्रेंडिंगमध्ये आलं आहे.

| Updated on: Jun 08, 2026 | 12:38 PM
1 / 5
'सबसे कातिल गौतमी पाटील' म्हणून ओळखली जाणारी नृत्यांगना गौतमी पाटील आणि अभिनेते भाऊ कदम यांची जोडी तुफान हिट ठरत आहे. 'हिल पोरी हिला' या गाण्यासाठी हे दोघं एकत्र आले असून आता फक्त महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशात हे गाणं ट्रेंड होतंय. दादा कोंडके यांच्या अजरामर गाण्याचा हा नवा ट्विस्ट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे.

'सबसे कातिल गौतमी पाटील' म्हणून ओळखली जाणारी नृत्यांगना गौतमी पाटील आणि अभिनेते भाऊ कदम यांची जोडी तुफान हिट ठरत आहे. 'हिल पोरी हिला' या गाण्यासाठी हे दोघं एकत्र आले असून आता फक्त महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशात हे गाणं ट्रेंड होतंय. दादा कोंडके यांच्या अजरामर गाण्याचा हा नवा ट्विस्ट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे.

2 / 5

'हिल पोरी हिला' हे गाणं सध्या भारतात युट्यूबवर टॉप ट्रेंडिंगमध्ये 24 व्या क्रमांकावर आहे. सोशल मीडियावर देखील या गाण्याची चर्चा होत असून ही नवी जोडी सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. दादा कोंडके यांच्या ‘आंधळा मारतो डोळा’ या गाजलेल्या चित्रपटातील ‘हिल हिल पोरी हिला’ हे गाणं त्या काळात प्रचंड लोकप्रिय ठरलं होतं.

3 / 5

तब्बल 52 वर्षांनंतर या गाण्याला आधुनिक संगीत आणि नव्या सादरीकरणाची जोड देत त्याचं रिमेक व्हर्जन सादर करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे या नव्या गाण्यात महाराष्ट्राची लाडकी नृत्यांगना गौतमी पाटील आणि लोकप्रिय अभिनेता भाऊ कदम यांची जोडी पहिल्यांदाच एकत्र पाहायला मिळत आहे.

4 / 5

या गाण्याचं चित्रीकरण कोकणातील निसर्गरम्य परिसरात करण्यात आलं असून हिरवागार निसर्ग, समुद्रकिनारे आणि मनमोहक लोकेशन्समुळे म्युझिक व्हिडीओ अधिकच आकर्षक बनला आहे. गाण्यामध्ये गौतमी पाटील आणि भाऊ कदम यांचेही विविध आकर्षक लूक पहायला मिळत आहेत.

5 / 5

नऊवारी साडी, वेस्टर्न लूक, रेट्रो स्टाइल अशा विविध लूक्समध्ये या दोघांनी सादर केलेल्या उत्स्फूर्त नृत्याचं प्रेक्षक कौतुक करत आहेत. नेटकऱ्यांनी या नव्या जोडीचं आणि गाण्याच्या सादरीकरणाचं भरभरून कौतुक केलं आहे. गौतमी पाटीलचा पुन्हा एकदा जलवा पाहायला मिळाला, दोघांनीही जबरदस्त डान्स केला आहे अशा प्रतिक्रिया चाहत्यांनी दिल्या आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us