Girija Oak: नॅशनल क्रश गिरीजा ओकचा ‘फिफ्टी शेड्स ऑफ ब्राऊन’ अंदाज; चाहते घायाळ

Girija Oak: नॅशनल क्रशचा टॅग मिळवलेली अभिनेत्री गिरीजा ओक तिच्या नव्या फोटोशूटमुळे सोशल मीडियावर चर्चेत आहे. फिफ्टी शेड्स ऑफ ब्राऊन असं कॅप्शन देत तिने हे फोटो पोस्ट केले आहेत.

| Updated on: Sep 06, 2026 | 11:56 AM
1 / 5
मराठी मनोरंजनविश्वातील अभिनेत्री गिरिजा ओक तिच्या अभिनयासोबतच सोशल मीडियावरील ग्लॅमरस अंदाजामुळेही नेहमी चर्चेत असते. नुकताच तिने सोशल मीडियावर शेअर केलेला एक फोटोशूट चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहे. या फोटोमध्ये गिरिजाचा हटके लूक पाहायला मिळत आहे.

मराठी मनोरंजनविश्वातील अभिनेत्री गिरिजा ओक तिच्या अभिनयासोबतच सोशल मीडियावरील ग्लॅमरस अंदाजामुळेही नेहमी चर्चेत असते. नुकताच तिने सोशल मीडियावर शेअर केलेला एक फोटोशूट चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहे. या फोटोमध्ये गिरिजाचा हटके लूक पाहायला मिळत आहे.

2 / 5

गिरिजाने या फोटोसोबत ‘Fifty shades of brown’ (फिफ्टी शेड्स ऑफ ब्राऊन) असं कॅप्शन दिलं आहे. तिचा हा लूक अतिशय आकर्षक दिसत आहे. ब्राऊन टोनमधील आउटफिट, त्याला साजेसं स्टायलिंग आणि मिनिमल पण उठावदार मेकअप यामुळे तिच्या लूकला एक खास क्लासी टच मिळाला आहे.

3 / 5

मोकळे केस आणि कानातील सुंदर इअररिंग्सने तिचा लूक आणखी खुलवला आहे. तिच्या चेहऱ्यावरील आत्मविश्वास आणि साध्या पोझमधील एलिगन्स चाहत्यांना विशेष भावला आहे. फोटो पोस्ट होताच त्यावर कमेंट्सचा पाऊस पडला. अनेकांनी हार्ट इमोजी आणि कौतुकाच्या प्रतिक्रिया देत तिच्या सौंदर्याचं कौतुक केलं.

4 / 5

एका चाहत्याने ‘स्टनिंग लूक’ अशी प्रतिक्रिया दिली, तर दुसऱ्याने ती खूप सुंदर दिसत असल्याचं म्हटलं. तिच्या या पोस्टला काही दिवसांतच मोठ्या संख्येने लाईक्स मिळाले आहेत.

5 / 5

गिरिजा ओकने तिच्या अभिनयातून वेगळी ओळख निर्माण केली आहे. मात्र, या फोटोशूटमधून तिचा फॅशन सेन्स आणि ग्लॅमरस अंदाजही तितकाच प्रभावी असल्याचं पुन्हा एकदा दिसून आलं. त्यामुळे तिचा हा नवीन लूक सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेचा विषय ठरत आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us