कायदा बाईच्या बाजूने असल्याने..; दुसऱ्या लग्नाविषयी गिरीश ओक स्पष्टच म्हणाले..

अभिनेते गिरीश ओक आणि त्यांची पत्नी पल्लवी ओक हे एका मुलाखतीत त्यांच्या लग्नात आलेल्या अडचणींबद्दल, समस्यांबद्दल मोकळेपणे व्यक्त झाले. 2008 मध्ये या दोघांनी लग्नगाठ बांधली होती. त्यांना एक मुलगी आहे.

| Updated on: Apr 09, 2026 | 10:39 AM
1 / 5
ज्येष्ठ अभिनेते गिरीश ओक यांच्यासाठी दुसरं लग्न करणं सोपं नव्हतं. त्यांनी 2008 मध्ये पल्लवीशी दुसरं लग्न केलं. त्यावेळी त्यांना प्रचंड मानसिक त्रास त्यांना सहन करावा लागला होता. प्रेम ते लग्नापर्यंतच्या प्रवासाबद्दल एका मुलाखतीत पल्लवी ओक व्यक्त झाली.

ज्येष्ठ अभिनेते गिरीश ओक यांच्यासाठी दुसरं लग्न करणं सोपं नव्हतं. त्यांनी 2008 मध्ये पल्लवीशी दुसरं लग्न केलं. त्यावेळी त्यांना प्रचंड मानसिक त्रास त्यांना सहन करावा लागला होता. प्रेम ते लग्नापर्यंतच्या प्रवासाबद्दल एका मुलाखतीत पल्लवी ओक व्यक्त झाली.

2 / 5

"लग्न ठरलं तेव्हा माझ्या घरातून प्रचंड विरोध झाला. लग्नाची प्रोसेस माझ्यासाठी आणि गिरीशसाठी खूप कठीण होती. मला खूप अपराधी वाटायचं. कारण गिरीशचं पहिलं लग्न झालं होतं. त्यामुळे सगळ्याच गोष्टी खूप विचित्र होत्या. आमची मैत्री जितकी छान होती, तितकंच हे सगळं पचवणं जड गेलं," असं पल्लवी दूरदर्शनला दिलेल्या मुलाखतीत म्हणाली.

3 / 5

याविषयी तिने पुढे सांगितलं, "आम्ही लग्नाआधी एकमेकांशी एक वर्ष बोलत नव्हतो. पुढे काय करायचं, करायचं की नाही, या सगळ्याच गोष्टीत आम्ही अडकलो होतो. माझ्या घरच्यांना ही गोष्ट मान्यच नव्हती. एकुलती एक मुलगी, त्यात वयात अंतर आणि गिरीश ओक विवाहित असणं घरच्यांना पटत नव्हतं."

4 / 5

"या सगळ्या गोष्टींचा खूप त्रास झाला, पण हे व्हायचंच होतं म्हणून आम्ही एकत्र आलो. पण आता सगळं छान आहे", अशी भावना पल्लवीने व्यक्त केली. या मुलाखतीत गिरीश ओक म्हणाले की, "हा संपूर्ण अनुभव खूप शिकवणारा होता. कायदा बाईच्या बाजूने असल्याने आपण चुकीचे वाटतो. पण नाण्याच्या दोन बाजू असतात."

5 / 5

"मी हे सगळं शिकवण म्हणून घेतलं आणि त्यातून बाहेर पडलो. पण दोन व्यक्तींमधील खासगी गोष्ट ही अनेकांसाठी मनोरंजनाचं साधन असतं. गिरीश आणि पल्लवी यांना एक मुलगी आहे. याविषयी ते पुढे म्हणाले, आम्ही आमच्या मुलीलाही कोणताही आडपडदा न ठेवता सांगितलं, जेणेकरून बाहेरचं कोणी तिला चुकीचं सांगू नये."

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us