तुमच्या साध्या कपड्यांना द्या स्टायलिश लूक, ‘या’ 5 टिप्स अन् उठून दिसेल तुमचं सौंदर्य
सध्या पाहायला गेलं तर, अनेक प्रकारचे कपडे बाजारात उपलब्ध असतात. पण प्रत्येक वेळी नवीन कपडे घेण्याची गरज नाही. तुम्ही तुमच्या जुन्या कपड्यांना एक स्टायलिश लूक देऊ शकता... त्यासाठी जाणून घ्या काही महत्त्वाच्या टिप्स, ज्यामुळे उठून दिसेल तुमचं सौंदर्य...

तुम्हाला कायम साडीसोबत एकच ब्लाउज घालण्याची गरज नाही. तुम्ही साधा, प्रिंटेड, भरतकाम केलेला किंवा कॉन्ट्रास्ट ब्लाउज निवडू शकता. यामुळे जुन्या साडीला एक नवीन लुक मिळेल. अगदी साधा पोशाखही कमी वेळात स्टायलिश दिसेल.
साध्या साडीसोबत बारीक बेल्ट घातल्यानं स्टायलिश लूक मिळू शकतो. तुम्ही सैल ड्रेस किंवा ओव्हरसाईज शर्टसोबतही बेल्ट वापरू शकता. त्यामुळे कंबरेचा भाग उठून दिसेल आणि पोशाखाला चांगला आकार मिळेल. ड्रेसच्या रंगाशी जुळणारा बेल्ट निवडणे महत्त्वाचे आहे.
साडी नेसण्याची पद्धत बदलल्यास तुमच्या लूकमध्ये मोठा बदल होऊ शकतो. नेहमीच्या निऱ्या घातलेल्या पदराऐवजी तुम्ही मोकळा पदर वापरून पाहू शकता. तुमच्या ब्लाउजच्या एका बाजूला दुपट्टा घेऊन पाहा. अगदी टी-शर्टवर डेनिम जॅकेट घातल्यानेही तुम्हाला एक नवीन लूक मिळेल.
तुम्ही नेकलेस, कानातले, ब्रेसलेट किंवा घड्याळ यांसारख्या अॅक्सेसरीज घालू शकता. जर तुम्ही साधा ड्रेस घातला असेल, तर कॉन्ट्रास्ट रंगांच्या अॅक्सेसरीज घातल्यास ते चांगले दिसेल. पण खूप जास्त अॅक्सेसरीज घालणं टाळा. पोशाखाला जुळणाऱ्या एक किंवा दोन अॅक्सेसरीज पुरेशा आहेत.
तुम्ही प्रत्येक वेळी एकाच पोशाखावर वेगवेगळ्या केशभूषा करून पाहू शकता. मोकळे केस, अंबाडा, पोनीटेल किंवा वेण्या घालून लूक बदलता येतो. त्याचप्रमाणे, स्नीकर्स, फ्लॅट्स, सँडल्स किंवा हील्स बदलून स्टाईल बदलता येते. एक योग्य हँडबॅग किंवा क्लच वापरल्यास तुम्हाला एक परिपूर्ण फॅशनेबल लूक मिळेल.