गोकुळ निवडणुकीत देवीच्या शपथेवरून वाद, मतदार संतापला, म्हणाला, तुमच्या पोराबाळांना…’.
गोकुळ निवडणुकीत देवीच्या शपथेवरून वाद झालाय. राजकीय नेत्यांच्या टीकेनंतर आता मतदार संतापला आहे. त्याने मतपेटीत चिठ्ठी टाकून नेत्यांना सुनावलं आहे .

कोल्हापूर गोकुळ दूध महासंघाच्या पंचवार्षिक निवडणूक मतदारांना दिलेल्या देवीच्या शपथेवरून जोरदार चर्चा होत आहे. या निवडणुकीत मतादारांना यल्लमा देवी, बाळूमामा यांची शपथ देण्यात आल्या. शपथ मोडल्यास ब्रेन स्ट्रोक येतो, अशी भीती मतदारांना घालण्यात आली.
कोल्हापुरातील 25 जागांसाठी काल मतदान पार पडलं. याच शपथेवरून आरोप-प्रत्योराप सुरू झाले आहेत. आता एका मतदारानेही राजकीय नेत्यांना झापलं आहे. या मतदाराच्या बोलक्या प्रतिक्रियेची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा होत आहे.
कोल्हापुरात गोकुळ दूधसंघ निवडणुकीची मतमोजणी होत आहे. या निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी सामना होत आहे. कोल्हापुरात एकूण 35 मतदान केंद्र होते.दूधसंघाच्या निवडणुकीत 50 उमेदवार रिंगणात होते. कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा, करवीर, कागल, गगनबावडा, गडहिंग्लज, चंदगड, पन्हाळा, भुदरगड, राधानगरी, शाहूवाडी, शिरोळ, हातकणंगले या तालुक्यातून मतदान पार पडलं.
कोल्हापुरातील महायुतीप्रणित छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडीने ही निवडणूक हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वात लढली.. तर महाविकास आघाडी प्रणित राजर्षी शाहू समविचारी आघाडी ही सतेज पाटील यांच्या नेतृत्वात लढली.
या निवडणुकीत मतदारांना देवीची शपथ घेण्यात सांगितलं. यावरून तुमच्या पोरा बाळांना निवडून आणण्यासाठी आम्ही शपथ घ्यायची का? असा सवाल मतदाराने विचारला. मतदाराने लिहिलेली ही चिठ्ठी मतपेटीत आढळली.