Gold Silver Rate : सोन्याच्या भावाने सगळेच थक्क, थेट पोहोचला…एका दिवसात तब्बल…

गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात वाढ होताना पाहायला मिळत आहे. आज सराफा बाजारात या दोन्ही धातूंच्या भावात चांगलीच वाढ झाली आहे.

| Updated on: Oct 31, 2025 | 5:28 PM
1 / 5
गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरामध्ये मोठे चढ-उतार पाहायला मिळत आहे. दिवाळीपूर्वी या दोन्ही मौल्यवान धातूंचा भाव सार्वकालिक उच्चांकावर पोहोचला होता.

2 / 5
सध्या जळगावच्या सराफ बाजारात सोन्याच्या आणि चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. सोन्याच्या दरात तब्बल 1 हजार 500 रुपये प्रति तोळा वाढ झाली आहे.

3 / 5
आज चांदीच्या दरातही वाढ झाली आहे. चांदीचा दर प्रति किलोमागे तब्बल 2 हजार रुपयांनी वाढल आहे. गेल्या काही दिवसांपासून सोने-चांदीच्या भावामध्ये अशाच प्रकारचा चढ-उतार पाहायला मिळत आहे.

4 / 5
आज वाढलेल्या भावानंतर आता सोन्याचे दर जीएसटी सह 1 लाख 24 हजार 115 रुपये प्रति तोळा तर चांदीचे दर जीएसटीसह 1 लाख 54 हजार 500 रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे.

5 / 5
दरम्यान, दिवाळीपूर्वी सोने, चांदीचा भाव सतत वाढत होता. दिवळी संपल्यानंतर अचानक सोन्याच्या भावात मोठी घसरण झाली. आता पुन्हा एकदा सोने-चांदीचा भाव वाढताना पाहायला मिळतोय. त्यामुळे आगामी काळात या मौल्यवान धातूंचा भाव कसा असेल हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.