मच्छर, किड्यांमुळे हैराण असाल तर घरात लावा ही 5 झाडं, जवळपासही कीडे, मच्छर भटकणार नाही
बदलत्या ऋतुसह घरात मच्छर, कीटक येत असतात. त्यांना संपवणं एक मोठं आव्हान असतं. पण अशा पाच वनस्पती आहेत, त्या घरात लावल्यास कीडे कोसो लांब पळतात. जाणून घ्या त्यांच्याबद्दल.

मच्छर आणि छोट्या किड्यांना दूर ठेवायचं असेल तर अजवायनची वनस्पती लावा. घरात ही वनस्पती उगवणं सोपं आहे. आरोग्यासाठी ही वनस्पती लाभकारी आहेच. पण अजवायनला जो वास येतो. त्यामुळे मच्छर, किडे दूर रहायला मदत होते.

लसूणच्या तिखट वासामुळे सुद्धा मच्छर आणि कीडे लांब राहतात. हे एक नैसर्गिक किटकनाशकासारखं काम करतं. लसूण तुम्ही घरात सहज उगवू शकता.

रोमजेरी एक हर्बल वनस्पती आहे. तिच्या सुंगधामुळे सुद्धा मच्छर आणि कीटक घरापासून लांब राहतात. याचा उपयोग तुम्ही किचनमध्ये सुद्धा करु शकता. रोजमेरी केसांसाठी सुद्धा उपयुक्त आहे. कमी खर्च आणि फार देखभालीची गरज नसते. दीर्घकाळ ही वनस्पती फ्रेश राहते.

लॅवेंडरचं झाडं सुंदर सुंगधांसाठी ओळखलं जातं. भले माणसांना लॅवेंडरचा सुंगध आवडत असेल पण मच्छर आणि किड्यांना अजिबात आवडत नाही. हे घरात लावल्यास मच्छर दूर पळतात. सोबतच घराच्या सजावटीसाठी सुद्धा तुम्ही याचा वापर करु शकता.

लेमन ग्रासमध्ये सिट्रोनेला नावाचं तत्व असतं. मच्छरांना दूर पळवण्यासाठी ते उपयुक्त ठरतं. हे घरात लावल्यामुळे वातावरण फ्रेश राहतं. कीडे सुद्धा दूर पळतात. अगदी सहजतेने ही वनस्पती उगवता येते. जास्त देखभाल करण्याची सुद्धा गरज पडत नाही.