हेल्दी आणि वजन कमी करण्यासाठी हा आहे अत्यंत फायदेशीर नास्ता, दररोजही…

निरोगी राहण्यासाठी सर्वात महत्वाचे ठरते की, तुम्ही नक्की काय खाता? जर दररोजच्या आहारात निरोगी पदार्थांचा समावेश केला तर आरोग्याच्या असंख्य समस्या या दूर होण्यास मदत होते.

| Updated on: Feb 24, 2026 | 2:08 PM
1 / 5
दररोज सकाळी नाश्त्यात नक्की काय खावे असा प्रश्न जवळपास सर्वांना पडतो. शिवाय सकाळी तेटकट तुपकट खाण्याची कोणाचीही इच्छा नसते. प्रत्येकाला सकाळच्या नाश्त्यात हेल्दी गोष्टी हव्या असतात. 

दररोज सकाळी नाश्त्यात नक्की काय खावे असा प्रश्न जवळपास सर्वांना पडतो. शिवाय सकाळी तेटकट तुपकट खाण्याची कोणाचीही इच्छा नसते. प्रत्येकाला सकाळच्या नाश्त्यात हेल्दी गोष्टी हव्या असतात. 

2 / 5

सकाळी नाश्ता तयार करण्यासाठी फार वेळही नसतो. मग शॉर्टकट मारला जातो. मात्र, नाश्त्यात कधीही शॉर्टकट मारू नका. कारण सकाळच्या नाश्ता आरोग्यासाठी फार जास्त महत्वाचा ठरतो. 

3 / 5

जर तुम्हाला सकाळी कमी वेळात आणि हेल्दी नाश्ता हवा असेल तर रात्री झोपतानाच ओट्स दुधात भिजत घाला. त्यानंतर हे फ्रीजमध्ये ठेवा. सकाळी उठल्यानंतर जे फळ आपल्याकडे उपलब्ध असेल ते कट करा. 

4 / 5

जसे की, सफरचंद, स्ट्रॉबेरी, पेरू, बनाना, डाळिंब, द्राश्र, चिकू यापैकी कोणतेही फळ आपण घेऊ शकता. हे फळ बारीक कट करता आणि ओट्समध्ये मिक्स करा. 

5 / 5

प्रवासादरम्यानही आपण आरामत हे खाऊ शकतो. विशेष म्हणजे हे अत्यंत हेल्दी ठरते आणि काही वेळ तुम्हाला भूकही अजिबात लागणार नाही. हे वजन कमी करण्यासाठीही फायदेशीर ठरते. 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us