मान्सूनच्या सुरुवातीलाच वरुणराजाचं रौद्ररूप… ढगफुटीसदृश पाऊस, पुरात वाहून गेली वाहने!

मान्सूनच्या सुरुवातीलाच वरुणराजाने रौद्ररूप धारण केले आहे. बेळगाव जिल्ह्यातील बैलहोंगळ आणि सवदत्ती (सौंदत्ती) तालुक्यांमध्ये झालेल्या मुसळधार ते अतिमुसळधार पावसामुळे प्रचंड दाणादाण उडाली आहे. रस्त्यांना नद्यांचे स्वरूप आले असून, अनेक ठिकाणी दुचाकी आणि रिक्षा पाण्याच्या प्रचंड वेगाने वाहून गेल्याच्या अंगावर काटा आणणाऱ्या घटना समोर आल्या आहेत.

| Updated on: Jun 09, 2026 | 3:17 PM
1 / 5
बैलहोंगळ शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे मुख्य रस्त्यांवरून पूर वाहू लागला आहे. पाणी इतक्या वेगाने वाहत होते की, रस्त्याच्या कडेला पार्क केलेल्या दुचाकी पत्त्यांसारख्या वाहून जाऊ लागल्या.

बैलहोंगळ शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे मुख्य रस्त्यांवरून पूर वाहू लागला आहे. पाणी इतक्या वेगाने वाहत होते की, रस्त्याच्या कडेला पार्क केलेल्या दुचाकी पत्त्यांसारख्या वाहून जाऊ लागल्या.

2 / 5

शहरातील इंचल क्रॉस (Inchal Cross) परिसरात तर अत्यंत थरारक दृश्य पाहायला मिळाले. पाण्याचा वेग प्रचंड असल्याने उभ्या असलेल्या बाईक्स वाहून जाऊ लागल्या, हे पाहून वाहनचालकांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून आपल्या गाड्या पकडण्यासाठी धावपळ सुरू केली.

3 / 5

स्थानिक नागरिकाने आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केलेला हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून, पावसाची भीषणता यातून स्पष्टपणे दिसून येत आहे. बाजारपेठ जलमय, व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

4 / 5

दुसरीकडे, सवदत्ती शहरातील मुख्य बाजारपेठेच्या रस्त्यावर सलग झालेल्या पावसामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली. पाऊस आणि पाण्याचा जोर एवढा मोठा होता की, चालू रस्त्यावर चालणारे ऑटो रिक्षा आणि दुचाकी वाहने पाण्याच्या मध्यभागीच अडकून पडली.

5 / 5

दुकानांमध्ये पाणी साचल्यामुळे व्यापाऱ्यांचे कापड, धान्य आणि इतर व्यावसायिक साहित्य पूर्णपणे ओले झाले आहे. यामुळे येथील व्यापारी आणि व्यावसायिक मोठ्या संकटात सापडले असून त्यांचे अतोनात आर्थिक नुकसान झाले आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us