Hama Malini: बॉलिवूडपासून दूर, तरीही गडगंज श्रीमंत आहेत हेमा मालिनी, संपत्तीचा आकडा थक्क करणारा

बॉलिवूडच्या ‘ड्रीम गर्ल’ म्हणजेच अभिनेत्री हेमा मालिनी यांचा आज वाढदिवस आहे. अनेक वर्ष चाहत्यांच्या मनावर आणि बॉक्स ऑफिसवर राज्य करत हेमा मालिनी यांनी कोट्यवधींची संपत्ती कमावली आहे. तर आता हेमा मालिनी राजकारणात देखली सक्रिय आहे... जाणून घ्या अंदाजे त्यांची संपत्ती किती आहे.

| Updated on: Oct 16, 2026 | 4:18 PM
1 / 5
बॉलिवूडच्या ‘ड्रीम गर्ल’ म्हणजेच अभिनेत्री हेमा मालिनी यांची आजही चाहत्यांमध्ये तेवढीच क्रेझ आहे. हेमा मालिनी आता 78 वर्षांच्या आहेत. पण त्यांच्याकडे पाहिल्यानंतर कोणी असं म्हणणार नाही त्यांनी सत्तरी ओलांडली आहे.

बॉलिवूडच्या ‘ड्रीम गर्ल’ म्हणजेच अभिनेत्री हेमा मालिनी यांची आजही चाहत्यांमध्ये तेवढीच क्रेझ आहे. हेमा मालिनी आता 78 वर्षांच्या आहेत. पण त्यांच्याकडे पाहिल्यानंतर कोणी असं म्हणणार नाही त्यांनी सत्तरी ओलांडली आहे.

2 / 5

हेमा मालिनी यांनी बॉलिवूडमध्ये अनेक संस्मरणीय सिनेमांमध्ये भूमिका साकारली आहे. खूप लोकप्रियता आणि प्रसिद्धी मिळवण्यासोबतच, अभिनेत्रीने स्वतःच्या कारकिर्दीत भरपूर संपत्तीही कमावली आहे.

3 / 5

हेमा मालिनी एकूण संपत्ती कोट्यवधींमध्ये आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी त्यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी त्यांची मालमत्ता 123.6 कोटी रुपये असल्याचे जाहीर केलं. त्यांच्याकडे कार कलेक्शन देखील फार मोठं आहे.

4 / 5

हेमा मालिनी यांनी 2004 मध्ये त्यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. 2014 मध्ये त्यांनी भाजपच्या तिकिटावर मथुरा येथून लोकसभा निवडणूक लढवली आणि जिंकली. त्यानंतर 2019 आणि 2024 च्या निवडणुकीत त्यांनी हीच पद्धत पुन्हा वापरली.

5 / 5

त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर, बॉलिवूडमध्ये करीयर करत असताना धर्मेंद्र यांच्या आयुष्यात अभिनेत्री हेमा मालिनी यांची एन्ट्री झाली आणि दोघांनी समाजाविरोधात जाऊन लग्न केलं. धर्मेंद्र यांनी पहिल्या पत्नीला घटस्फोट न देता हेमा मालिनी यांच्याशी दुसरं लग्न केलं होतं.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us