कुंपणानेच शेत खाल्ले म्हणण्याची वेळ, HDFC बँकेतून अतिसंवेदनशील माहिती लीक, थेट..
HDFC बँकेत धक्कादायक प्रकार घडला. या प्रकाराने मोठी खळबळ उडाली. थेट HDFC बँकेची अत्यंत महत्वाची बातमी लीक करण्यात आली. बड्या अधिकाऱ्यांनी ही माहिती लीक केली. सध्याच्या घडीला चाैकशी केली जात आहे.

HDFC बँकेची संवेदनशील माहिती लीक झाल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला. यात सर्वात धक्कादायक बाब म्हणजे ही माहिती दुसऱ्या तिसऱ्या कोणी नसून बँकेतील बड्या अधिकाऱ्यांनीच लीक केली.
HDFC बँकेच्या अंतर्गत तपासात माहिती मिळाली आहे की, दोन बड्या अधिकाऱ्यांना गोपनीय माहिती आणि बिझनेस रणनीती आणि बाजारावर परिणाम करणारी संवेदनशील माहिती दिली.
हे अधिकारी बँकेच्या व्यवसाय आणि त्याची पाहणी करत. ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार, काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यावर चिंता व्यक्त केली आणि अंतर्गत चाैकशी सुरू केली.
ज्यात ही माहिती बाहेर देणाऱ्यांची नावे पुढे आली. मिळालेल्या माहितीनुसार, सध्याच्या घडीला चाैकशी सुरू आहे. चाैकशीत काय निघते, याकडे सर्वांच्या नजरा आहेत.
HDFC बँकेच्या एका प्रवक्ताने यावर बोलताना म्हटले की, पूर्ण गोष्टी स्पष्ट होत नाहीत तोवर आम्ही काही यावर भाष्य करणार नाहीत.