चहा पिण्याचे प्रमाण काय? वयानुसार किती कप चहा प्यावा? जाणून घ्या

वयानुसार आणि आरोग्यानुसार दिवसाला किती कप चहा प्यावा? अति चहा पिण्याचे तोटे आणि चहा पिण्याची योग्य वेळ कोणती, याबद्दल तज्ज्ञांनी दिलेला महत्त्वाचा सल्ला सविस्तर वाचा.

| Updated on: Jun 03, 2026 | 3:14 PM
1 / 6
भारतात चहाशिवाय सकाळची सुरुवात होणे अशक्यच मानले जाते. अनेकांना अंथरुणातून उठल्याबरोबर बेड टी (Bed Tea) हवा असतो, तर काही जण ऑफिसमध्ये किंवा कामाच्या गडबडीत दिवसभर चहाचे कप रिकामे करत असतात. पण तुम्ही कधी विचार केला आहे का, की तुमच्या वयानुसार आणि आरोग्यानुसार तुम्ही दिवसाला नेमका किती चहा प्यायला पाहिजे?

2 / 6

तज्ज्ञांच्या मते, गरजेपेक्षा जास्त चहा प्यायल्याने शरीराला गंभीर हानी पोहोचू शकते. डॉक्टर चहा पिणे पूर्णपणे बंद करायला सांगत नाहीत, परंतु त्याचे योग्य प्रमाण आणि वेळ राखणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

3 / 6

चहा पिण्याचे प्रमाण हे व्यक्तीचे वय, त्याचे आरोग्य आणि जीवनशैलीवर अवलंबून असते. किशोरवयीन मुले आणि तरुण या वयोगटातील मुलांच्या शारीरिक आणि मानसिक विकासाचा काळ असतो. त्यामुळे त्यांनी दिवसातून १ ते २ कपांपेक्षा जास्त कॅफीनयुक्त चहा पिणे टाळावे.

4 / 6

जे तरुण किंवा मध्यमवयीन लोक पूर्णपणे निरोगी आहेत, त्यांच्यासाठी दिवसातून ३ ते ५ कप ग्रीन टी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते.

5 / 6

तज्ज्ञांच्या मते, कोणत्याही सामान्य व्यक्तीने दिवसभरात ३०० मिलीग्रॅमपेक्षा जास्त कॅफीनचे सेवन करू नये. चहामधील कॅफीन शरीराला ऊर्जा देते, परंतु त्याचे अतिसेवन आरोग्यासाठी घातक ठरू शकते.

6 / 6

टीप - ही माहिती आरोग्य तज्ञांच्या मतांवर आधारित आहे. याला कोणत्याही वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय मानू नये. आपल्या दैनंदिन जीवनात किंवा आहारात कोणताही नवीन बदल करण्यापूर्वी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us