‘देऊळ बंद 2’साठी प्रवीण तरडेंनी किती घेतलं मानधन? मुख्य कलाकारांपेक्षा दुप्पट-तिप्पट स्वीकारतात फी

Pravin Tarde's fee : मराठीतील अत्यंत यशस्वी लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेते प्रवीण तरडे यांनी त्यांच्याच 'देऊळ बंद 2' या चित्रपटासाठी किती मानधन घेतलं, यावर प्रतिक्रिया दिली आहे. तसंच या यशानंतर आता फी वाढवणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.

| Updated on: Jul 14, 2026 | 9:41 AM
1 / 5
रितेश देशमुखचा 'राजा शिवाजी' आणि प्रवीण तरडे यांच्या 'देऊळ बंद 2' या दोन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर कमाईचा 100 कोटींचा टप्पा पार करत मराठी सिनेसृष्टीत पुन्हा एकदा 'अच्छे दिन' आणले आहेत. 21 मे 2026 रोजी प्रवीण तरडे लिखित आणि दिग्दर्शित 'देऊळ बंद 2' हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. अवघ्या नऊ ते दहा कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने 100 कोटी रुपयांहून अधिक कमाई केली आहे.

2 / 5
प्रदर्शनाच्या 39 व्या दिवशी या चित्रपटाने हा विक्रम केला आहे. चित्रपटाच्या या अफाट यशानंतर आता प्रवीण तरडे यांनी त्यांना मिळालेल्या मानधनाचा खुलासा केला आहे. दिग्दर्शक म्हणून तुम्ही किती मानधन घेता आणि ते चित्रपटातील मुख्य अभिनेत्यापेक्षा जास्त असतं का, असा प्रश्न प्रवीण तरडे यांना नुकत्याच एका मुलाखतीत विचारण्यात आला.

3 / 5
त्यावर उत्तर देताना प्रवीण तरडे म्हणाले, "प्रामाणिकपणे सांगायचं झाल्यास, मी पैशांचा फार विचार करत नाही. मी जेवढं सांगतो, तेवढं मानधन मला निर्माते देतात. पहिल्यापेक्षा आता मी बऱ्यापैकी जास्त फी घेतो. 'देऊळ बंद 2'च्या यशानंतर मी माझं मानधन आणखी वाढवणार आहे. 'मुळशी पॅटर्न'चा करार हा माझा आजवरचा सर्वांत मोठा करार होता. मी चित्रपटातील मुख्य कलाकारांपेक्षा दुप्पट ते तिप्पट मानधन स्वीकारतो."

4 / 5
माझं मानधन कोटीच्या पुढे नाही तर 'कोटींच्या' पुढे असं असं म्हणताच मुलाखतकर्त्याने त्यांना विचारलं की, मराठी इंडस्ट्रीत एवढं मानधन मिळतं का? त्यावर निर्माते कैलाश वाणी आणि प्रवीण तरडे त्याला म्हणाले, "तुम्ही मराठीला गरीब इंडस्ट्री समजता का? एखाद्या मराठी माणसाने जास्त मानधन घेतलं, तर तो वाईट होतो का?"

5 / 5
या मुलाखतीत प्रवीण तरडेंनी पुढे असाही खुलासा केला की, ते एका चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन करण्यासाठी जवळपास अडीच कोटी रुपये मानधन घेतात. सध्या मराठी चित्रपटसृष्टीत प्रवीण तरडेंचा पॅटर्न हिट ठरतोय. 'मुळशी पॅटर्न', 'धर्मवीर', 'धर्मवीर 2', 'देऊळ बंद', 'देऊळ बंद 2' यांसारखे त्यांचे चित्रपट हिट ठरले आहेत.

Follow Us