हेडफोनचा आवाज कमी येतोय? मग घरातील एक वस्तू नक्कीच करेल तुमची मदत, फक्त…

तुमचे हेडफोन्स खराब झाले आहेत का? घरच्या घरी हेडफोन आणि इयरबड्स सुरक्षितपणे स्वच्छ करण्यासाठी आणि त्यांचा आवाजाचा दर्जा टिकवून ठेवण्यासाठी या सोप्या टिप्स फॉलो करा.

| Updated on: Feb 25, 2026 | 1:55 PM
1 / 8
आजकाल मोबाईलप्रमाणे हेडफोन देखील आपल्या दैनंदिन जीवनातील अविभाज्य भाग झाला आहे. ऑफिसच्या मिटिंगपासून ते प्रवासात गाणी ऐकण्यापर्यंत आपण सतत हेडफोनचा वापर करत असतो. मात्र, सततच्या वापरामुळे हेडफोनवर धूळ, घाम आणि कानातील मळ (Earwax) साचतो. यामुळे केवळ आवाजाचा दर्जा खालावतो, पण त्यासोबतच कानाला संसर्ग होण्याचा धोकाही असतो.

आजकाल मोबाईलप्रमाणे हेडफोन देखील आपल्या दैनंदिन जीवनातील अविभाज्य भाग झाला आहे. ऑफिसच्या मिटिंगपासून ते प्रवासात गाणी ऐकण्यापर्यंत आपण सतत हेडफोनचा वापर करत असतो. मात्र, सततच्या वापरामुळे हेडफोनवर धूळ, घाम आणि कानातील मळ (Earwax) साचतो. यामुळे केवळ आवाजाचा दर्जा खालावतो, पण त्यासोबतच कानाला संसर्ग होण्याचा धोकाही असतो.

2 / 8

जर तुम्हीही सतत हेडफोन वापरत असाल आणि ते खराब झाले असतील तर ते तुम्ही घरच्या घरी स्वच्छ करु शकता. तुमचे हेडफोन घरच्या घरी स्वच्छ करण्यासाठी आणि ते खराब होऊ नयेत म्हणून तुम्ही खालील टिप्स फॉलो करु शकता.

3 / 8

हेडफोन पुसण्यासाठी नेहमी कोरड्या आणि मऊ सुती कापडाचा वापर करा. ओलावा टाळण्यासाठी ओल्या कपड्याचा वापर करणे टाळा. हेडफोनच्या स्पीकरवरील बारीक जाळीत अडकलेला मळ काढण्यासाठी जुन्या आणि कोरड्या टूथब्रशचा वापर करा. हा ब्रशने हलक्या हाताने घासल्यास त्यातील मळ सहज बाहेर येतो.

4 / 8

एका कापसाच्या बोळ्यावर थोडे सॅनिटायझर किंवा रबिंग अल्कोहोल घेऊन हेडफोनचा बाहेरील प्लास्टिक भाग पुसून घ्या. यामुळे त्यावरील जंतू नष्ट होतील.

5 / 8

जर तुमचे इयरफोन्स सिलिकॉन टिप्सचे असतील, तर ते काढून कोमट साबणाच्या पाण्यात ५-१० मिनिटे भिजत ठेवा आणि पूर्ण वाळल्यावरच वापरा. तसेच वर्कआउटनंतर हेडफोन लगेच बॅगेत न टाकता कोरड्या कापडाने पुसून घ्या.

6 / 8

पावसापासूनही त्यांचे संरक्षण करा. वायर्ड इयरफोन्सची वायर घट्ट गुंडाळू नका. यामुळे आतील तारा तुटू शकतात. नेहमी गुंडाळून किंवा एखाद्या कव्हरमध्ये ठेवा. इयरबड्स किंवा हेडफोन थेट खिशात किंवा बॅगेत न टाकता नेहमी त्यांच्या चार्जिंग केसमध्ये किंवा पाऊचमध्ये ठेवा.

7 / 8

सतत मोठ्या आवाजात गाणी ऐकल्याने स्पीकरच्या पडद्यावर ताण येतो आणि आवाजाचा दर्जा खालावतो. तुम्ही वापरत असलेले हेडफोन इतरांना वापरण्यास देऊ नका. यामुळे कानाचा संसर्ग टाळता येतो.

8 / 8

जर तुम्ही तुमच्या हेडफोनची योग्य काळजी घेतली तर तुमचे हेडफोन केवळ दीर्घकाळ टिकणार नाहीत, तर तुमच्या कानांचे आरोग्यही सुरक्षित राहील. त्यामुळे कोणत्याही तंत्रज्ञानाचा वापर करताना स्वच्छतेची ही छोटीशी सवय नक्कीच फायदेशीर ठरेल.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us