लॅपटॉपच्या कीबोर्डमधली घाण बघून किळस येते, मग घरात करता येईल स्वच्छ, सोपी ट्रिक जाणून घ्या

तुमच्या लॅपटॉपच्या कीबोर्डमध्ये धूळ आणि कचरा साचला आहे का? महागड्या क्लिनिंग किटशिवाय घरगुती वस्तू वापरून लॅपटॉपचा कीबोर्ड सुरक्षितपणे कसा स्वच्छ करावा, याची सविस्तर माहिती आणि सोप्या टिप्स या लेखात वाचा.

| Updated on: Apr 23, 2026 | 1:32 PM
1 / 8
हल्ली प्रत्येकजण तासनतास लॅपटॉपवर काम करतो, पण त्याच्या स्वच्छतेकडे मात्र अनेकदा दुर्लक्ष होते. रोजच्या वापरामुळे किबोर्डच्या बटणांखाली धूळ, केसांचे कण आणि अन्नाचे बारीक तुकडे जमा होतात. यामुळे फक्त लॅपटॉप खराब होत नाही, तर कीबोर्ड खराब होऊन गॅझेटचे आयुष्यही कमी होऊ शकते.

2 / 8
मग अशावेळी कीबोर्ड कसा स्वच्छ करायचा असा प्रश्न अनेकांना पडलेला असतो. यासाठी काही जण महागडे किट खरेदी करतात. पण आता लॅपटॉप स्वच्छ करण्यासाठी तुम्हाला महागड्या क्लिनिंग किट्स खरेदी करण्याची गरज पडणार नाही. घरात उपलब्ध असलेल्या साध्या वस्तूंनी तुम्ही लॅपटॉपचा कीबोर्ड स्वच्छ करु शकता.

3 / 8
लॅपटॉपचे कीबोर्ड स्वच्छ करण्याची प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी तुमचा लॅपटॉप पूर्णपणे शट डाऊन (Shut Down) करा. जर लॅपटॉपची बॅटरी काढता येत असेल, तर ती बाजूला ठेवा आणि चार्जर डिस्कनेक्ट करा. लॅपटॉप चालू असताना साफसफाई केल्यास शॉर्ट सर्किट होण्याचा किंवा चुकून बटणे दाबल्यामुळे डेटाचे नुकसान होण्याचा धोका असतो.

4 / 8
सर्वात आधी लॅपटॉप उघडा आणि काळजीपूर्वक उलटा धरा. त्याच्या मागच्या बाजूला हाताने हळूवारपणे टॅप करा. असे केल्याने बटणांच्या फटीत अडकलेले धुळीचे मोठे कण आणि कचरा सहजपणे खाली पडेल. लक्षात ठेवा, लॅपटॉप जोरात हलवू नका, हलक्या हाताने हे काम करा.

5 / 8
कीबोर्डच्या कोपऱ्यांमध्ये अडकलेली धूळ काढण्यासाठी घरातील जुना मेकअप ब्रश किंवा मऊ पेंट ब्रश अत्यंत प्रभावी ठरतो. बटणांमधील जागेत ब्रश फिरवल्याने सूक्ष्म कचरा बाहेर येतो. मात्र, चुकूनही कडक केस असलेला ब्रश वापरू नका, कारण यामुळे कीबोर्डवर ओरखडे पडू शकतात.

6 / 8
बोटांचे तेलकट ठसे आणि चिकट डाग काढण्यासाठी मायक्रोफायबर कापड सर्वोत्तम आहे. कापड थोडे ओले करून बटणे पुसून घ्या. जर घाण जास्त असेल, तर आयसोप्रोपिल अल्कोहोल (Isopropyl Alcohol) वापरा. एका कॉटन बडवर (Earbud) थोडे अल्कोहोल घेऊन बटणांच्या कडा स्वच्छ करा. अल्कोहोल लवकर सुकत असल्याने सर्किटला इजा पोहोचत नाही.

7 / 8
कीबोर्डवर कधीही पाणी फवारू नका. त्यामुळे अंतर्गत भागांचे नुकसान होऊ शकते. बटणांमधील कचरा काढण्यासाठी सुई, टाचणी किंवा चाकूचा वापर करू नका. यामुळे बटणांची रचना (Mechanism) खराब होऊ शकते.

8 / 8
लॅपटॉप सुरळीत चालण्यासाठी दर आठवड्याला हलकी स्वच्छता आणि महिन्यातून किमान एकदा डिप क्लिनिंग करणे आवश्यक आहे. यामुळे तुमचे गॅझेट दीर्घकाळ नवीन आणि कार्यक्षम राहील.

Follow Us