Goat Farming : शेतकरी होईल मालामाल, शेळीपालन केल्यास सरकार पुरवणार पैसे, तब्बल 60 टक्के अनुदान, वाचा…
शेळीपालन करायचे असेल तर त्यासाठी तुम्हाला एका शेडची निर्मिती करावी लागते. तसेच चारा उपलब्ध करावा लागतो. पशू चिकित्सकाच्या सूचनेनुसार शेळ्यांचे लसीकरणही करावे लागते.

सध्या राज्यात दुष्काळ पडलेला आहे. त्यामुळे शेतीसोबतच दुसरे पुरक व्यवसाय करण्याचा शेतकऱ्यांना सल्ला दिला जातोय. भविष्यात अशा प्रकारचा दुष्काळ पडला तर होरपळ होऊ नये. शेतकरी आर्थिक दृष्टीकोनतून बळकट व्हावा यासाठी शेतीपूरक व्यवसायाकडे वळा असे सांगितले जातेय.
दरम्यान, शेळीपालन हा असाच एक शेतीपूरक व्यवसाय आहे. या व्यवसायात थोडीशी गुंतवणूक केली तर दीर्घकालीन उत्पन्नाचा नवा स्त्रोत तयार होऊ शकतो. विशेष म्हणजे या व्यवसायासाठी सरकार आर्थिक मदतही पुरवते.
शेळीपालन करायचे असेल तर त्यासाठी तुम्हाला एका शेडची निर्मिती करावी लागते. तसेच चारा उपलब्ध करावा लागतो. पशू चिकित्सकाच्या सूचनेनुसार शेळ्यांचे लसीकरणही करावे लागते.
मांस आणि दूध चांगले मिळेल अशा शेळीच्या जाती निवडणे गरजेचे आहे. ब्लॅक बंगाल, बरबरी, जमुनापारी अशा काही शेळ्यांच्या चांगल्या प्रजाती आहेत.
राष्ट्रीय पशुधन मिशन (NLM) अंतर्गत सरकार शेळीपालनासाठी आर्थिक मदत पुरवते. विशेष म्हणजे लाभार्थ्याला साधारण 50 ते 60 टक्के अनुदानही मिळते. हे अनुदान प्रत्येक लाभार्थ्यानुसार बदलत राहते.