Tips and Tricks : पावसाळ्यात ओले कपडे कसे वाळवायचे ? वापरा या सोप्या टिप्स अन् कपडे वाळतील खडखडीत
पावसाळ्यात सूर्यप्रकाश , ऊन कमी असल्यामुळे कपडे वाळायला जास्त वेळ लागतो. मात्र, योग्य पद्धतींचा वापर केल्यास ही समस्या बऱ्याच अंशी कमी करता येते. यामुळे कपडे लवकर वाळतात आणि त्यातील ओलावा व दुर्गंधीची समस्याही उद्भवत नाही. जाणून घ्या सोप्या टिप्स

सध्या राज्यभरात मुसळधार पाऊस कोसळतोय. सततचा पाऊस आणि सूर्यप्रकाशाचा अभाव यामुळे दोन दिवस उलटूनही धुतलेले कपडे पूर्णपणे वाळत नाहीत. यामुळे कपड्यांमध्ये ओलावा तर राहतोच पण दुर्गंधी देखील निर्माण होऊ शकते, ज्यामुळे बुरशीजन्य संसर्ग आणि त्वचेच्या ॲलर्जीचा धोका वाढू शकतो. ( All Photos : Getty Images)

कपड्यांमधील अतिरिक्त पाणी पूर्णपणे काढून टाका: कपडे धुतल्यानंतरची पहिली पायरी म्हणजे त्यातील अतिरिक्त पाणी पूर्णपणे काढून टाकणे. वॉशिंग मशीनमध्ये 'स्पिन मोड' असतो, त्यामुळे तुम्ही 'स्पिन सायकल' नक्कीच चालवली पाहिजे. यामुळे कपड्यांमधील ओलावा बऱ्याच प्रमाणात कमी होतो. मात्र काही सोप्या टिप्स वापरून, तुम्ही कपडे खडखडीत वाळवू शकता.

कपड्यांमधील जास्तीचं पाणी पूर्णपणे काढून टाका : कपडे धुतल्यानंतरची पहिली पायरी म्हणजे त्यातील जास्तीचं पाणी पूर्णपणे काढून टाकणं. वॉशिंग मशीनमध्ये 'स्पिन मोड' असतो, त्यामुळे तुम्ही 'स्पिन सायकल' नक्कीच चालवू शकताजे. यामुळे कपड्यांमधील ओलावा बऱ्याच प्रमाणात कमी होतो.

टॉवेलचा वापर: जर कपडे खूप ओले असतील, तर त्यांना एका कोरड्या आणि जाड टॉवेलमध्ये गुंडाळा. त्यानंतर, त्यावर हलकेच दाबा. कपड्यांमधील अतिरिक्त पाणी टॉवेल शोषून घेतो, ज्यामुळे कपडे लवकर वाळण्याची शक्यता वाढते.

पंख्याखाली वाळवा: जर पावसामुळे पुरेसा सूर्यप्रकाश किंवा ऊन उपलब्ध नसेल, तर कपडे वाळवण्यासाठी ते खेळती हवा असलेल्या खोलीत ठेवा. सततच्या हवेच्या प्रवाहामुळे कपड्यांमधील ओलावा लवकर कमी होण्यास मदत होते.

कपडे वाळत घालताना पुरेशी जागा ठेवा : अनेक लोक कपडे एकमेकांच्या अगदी जवळ किंवा एकमेकांवर वाळत घालतात. यामुळे हवा खेळती राहण्यात अडथळा येतो आणि कपडे वाळण्यास उशीर होतो. त्यामुळे कपडे वाळत घालताना प्रत्येक कपड्यामध्ये थोडी जागा ठेवा, जेणेकरून सर्व बाजूंनी हवा लागू शकेल.

हँगर्सचा वापर करा : शर्ट, टी-शर्ट, कुर्ते आणि ड्रेसेस यांसारखे कपडे कपड्यांच्या दोरीवर दुमडून टाकण्याऐवजी हँगर्सवर लटकवून वाळत घाला. यामुळे जागा कमी लागते, आणि कपड्यांचा अधिक भाग हवेच्या संपर्कात येतो आणि ते लवकर वाळतात.