शून्य रुपये खर्च, पण झुरळांचा क्षणात नायनाट, हा नुस्का वापरल्यास होईल चमत्कार!
झुरळ या कीटकामुळे अनेक आजार होऊ शकतात. झुरळ अन्नावर बसल्यास जुलाबही होण्याची शक्यता आहे. म्हणूनच झुरळाला घरातून हाकलून लावण्यासाठी अनेकजण खूप सारे प्रय़त्न करतात. परंतु तरीदेखील घरातील झुरळ हे काही नाहीसे होतच नाहीत.

झुरळ हा असा कीटक आहे, ज्याला पाहताच अनेकांना चीड येते. काही महिला तर झुरळ पाहून थेट पळून जातात. झुरळ चावत नाही, परंतु त्यांच बाह्य शरीर खूपच क्रुर असतं. त्यामुळे त्याला पाहताच अनेकांची चीडचीड होते.

झुरळ या कीटकामुळे अनेक आजार होऊ शकतात. झुरळ अन्नावर बसल्यास जुलाबही होण्याची शक्यता आहे. म्हणूनच झुरळाला घरातून हाकलून लावण्यासाठी अनेकजण खूप सारे प्रय़त्न करतात. परंतु तरीदेखील घरातील झुरळ हे काही नाहीसे होतच नाहीत.

दम्यान, तुम्ही एक रुपयाही खर्च न करता झुरळाला घरातून हाकलून लावू शकता. त्यासाठी तुम्ही कडुलिंबाच्या पाल्याचा उपयोग करू शकतो. कडुलिंबाचा रस वापरू शकता. कडूलिंबाच्या पाल्याची चव कडू असते. याच कडूलिंबाचा रस पाण्यात मिसळायचा.

त्यानंतर हे मिश्रण एका बॉटलमध्ये भरून तो झुरळ ज्या ठिकाणी असतात, त्या ठिकाणी स्प्रे करायचा. असे केल्यास ज्या- ज्या ठिकाणी झुरळ लापून बसतात, तेथून ते पळ काढतात. यामुळे घरातील झुरळ कमी होण्यास मदत होऊ शकते.

(टीप- या लेखातील सर्व माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. सविस्तर माहितीसाठी किंवा कोणताही प्रयोग करण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांशी संपर्क साधावा)