या चार ट्रिक वापरा, कुलरमधून येईल एसीसारखी थंडगार हवा, गर्मीमध्ये वाजेल थंडी!

आजकाल उष्णताच एवढी आहे की कितीही कुलर लावलं तरीही गर्मी काही कमी होत नाहीये. उलट कुलरमधील हवादेखील गरम येत असल्याचे अनेकदा दिसून येते. अशा वेळी खालील ट्रिक वापरल्यास तुमच्या कुलरमधून थंड हवा येऊ शकते.

| Updated on: May 26, 2026 | 7:35 PM
1 / 5
सध्या उन्हाळा सुरू असल्याने घरात तसेच बाहेर भीषण गर्मी आहे. या उष्णतेने अंगावर घाम-घाम होत आहे. घरात बसून राहिलं तरीदेखील उष्णतेने अस्वस्थ झाल्यासारखं होत आहे. अशा वेळी तुम्हाला कुलर हा एक चांगला पर्याय आहे. कुलरच्या मदतीने तुम्हाला घरात थोडं थंड वाटू शकतं.

2 / 5
परंतु आजकाल उष्णताच एवढी आहे की कितीही कुलर लावलं तरीही गर्मी काही कमी होत नाहीये. उलट कुलरमधील हवादेखील गरम येत असल्याचे अनेकदा दिसून येते. अशा वेळी खालील ट्रिक वापरल्यास तुमच्या कुलरमधून थंड हवा येऊ शकते.

3 / 5
गर्मीमध्ये तुमच्या घरातील कुलरमधून गरम हवा येत असेल तर अशा वेळी तुम्ही कुलरच्या समोर एखादा ओला पडदा लावावा. या ओल्या पडद्यामुळे तुमच्यापर्यंत थंड हवा येते. कुलरची गरम हवा नाहिशी होते. पडदा कोरडा पडल्यास पुन्हा तो ओला करावा.

4 / 5
कुलरमधील पाणी संपल्यावरदेखील हवा गरम लागायला लागते. त्यामुळे कुलरमधील पाण्याच्या टाकीत पुरेसे पाणी असेल, याची खात्री करून घ्या. तसेच पाण्याची टाकी पूर्ण भरण्यास कंटाळा करू नका. टाकीत पाणी भरपूर असेल तर कुलरमधून थंडगार हवा येते.

5 / 5
कुलरमध्ये असलेल्या पाण्याच्या टाकीत बर्फ टाकल्यास पाणी थंड होते. परिणामी कुलरमधून येणारी हवादेखील थंडगार असते. सोबतच कुलरमधून तुम्हाला थंडगार हवा हवी असेल तर बाहेरची मोकळी हवा आत येणे गरजेचे आहे. बाहेरची हवाच नसेल तर कुलरमधून येणारी हवादेखील थंड नसते.

Follow Us