एकही रुपया खर्च नाही, झटक्यात नाहीसे होईल कोळ्याचे जाळे, फक्त वापरा किचनमधील ही एक…
घरात कोळ्याचे जाळे दिसले की अनेकजण घाबरतात. कोळ्याचे जाळे होऊ नयेत म्हणून अनेक लोक घरात महागड्या स्प्रेची फवारणी करतात. परंतु तुम्ही एकही रुपया खर्च न करता घरातील कोळींना बाहेरचा रस्ता दाखवू शकता.

घर जेवढं साफ असेल, तेवढं त्या घरात राहायला छान वाटतं. किचन आणि घरात साफसफाई ठेवली तर वेगवेगळे आजार होत नाहीत. कारण घराची नियमित सफाई न केल्यास कोपऱ्यांमध्ये, खिड्यांमध्ये तसेच अडगळीच्या ठिकाणी किडे, मच्छर, कोळ्याचे जाळे तयार व्हायला सुरुवात होते.

कोळी हा कीटक तसा घरासाठी उपयुक्त असतो. कारण तो इतर छोट्या कीटकांना खाऊन टकतो. परंतु तरीदेखील अनेक महिला, पुरुषांना कोळी किंवा कोळ्याचे जाळे घरात दिसलेले आवडत नाही. कोळ्याचे जाळे हे दिसायला खूप सुंदर असते. परंतु अनेकजण कोळ्याचे जाळे दिसतात पळून जातात.

म्हणूनच घरात कोळी आणि कोळ्याचे जाळे झाल्यावर अनेकजण बाजारातून महागडे स्प्रे घेऊन येतात. घराता सगळीकडे ते फवारतात. परंतु तरीदेखील काही दिवसांनी घरात कोळ्याचे जाळे दिसतेच. त्यामुळेच घराची कोळ्याच्या तावडीतून कशी सुटका करायची, ते जाणून घेऊ या...

तुमच्याकडे पुदिन्याचे तेल असेल तर त्याचा स्प्रे करून तुम्ही घरातील कोळ्यांना बाहेर पळवून लावू शकता. त्यासाठी पाण्याने भरलेली एक बॉटल घ्या. त्यात 10 ते 15 थेंब पुदिन्याचे तेल टाका. हे पाणी खिडकी, घराची चौकट, घरातील कोपऱ्यात स्प्रे करा. त्यानंतर घरातील कोळी नाहीसे होतील.

(टीप- या लेखातील सर्व माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. सविस्तर माहितीसाठी किंवा कोणताही प्रयोग करण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांशी संपर्क साधावा)