आता चिंताच मिटली, रेल्वेमध्ये सोबत आधार कार्ड नसले तरी TTE तुम्हाला दंड लावणार नाही; हा पर्याय ठरेल वरदान
तुम्ही रिझर्व्ह तिकिटाने प्रवास करत असाल तर अनेकदा टीटीई तुमच्या नावाची तपासणी करतो. रिझर्व्ह केलेल्या तिकिटावर योग्य व्यक्ती बसलेली आहे की नाही, हे टीटीई तपासत असतात. अशा वेळी तुमच्याकडे तुमच्या आधार कार्डची कॉपी नसेल तर तुमची अडचण वाढू शकते.

रेल्वेत प्रवास करताना तुम्ही तिकीट काढलेले असणे फार गरजे आहे. तुमच्याकडे तिकीट नसेल तर टीटीई तुमच्याकडून फाईन तसेच प्रवासाचे पैसे वसूल करू शकतो. परंतु अनेकवेळा तिकीट काढलेले असूनही तुम्ही अडचणीत सापडण्याची शक्ता असते.

तुम्ही रिझर्व्ह तिकिटाने प्रवास करत असाल तर अनेकदा टीटीई तुमच्या नावाची तपासणी करतो. रिझर्व्ह केलेल्या तिकिटावर योग्य व्यक्ती बसलेली आहे की नाही, हे टीटीई तपासत असतात. अशा वेळी तुमच्याकडे तुमच्या आधार कार्डची कॉपी नसेल तर तुमची अडचण वाढू शकते.

खरे आधार कार्ड घरी विसरल्याने आता टीटीईला स्वत:ची ओळख कशी पटवून द्यावी, असा प्रश्न तुम्हाला पडू शकतो. अशा वेळी तुम्ही तुमचे ड्रायव्हिंग लायन्सन, मतदान कार्ड, पासपोर्टही दाखवू शकता.

तसेच तुम्ही सरकारच्या नव्या आधार अॅपचा वापर करूनही तुमचे डिजीटल आधार कार्ड टीटीईला दाखवू शकता. सरकारच्या नव्या आधार अॅपच्या मदतीने तुम्ही दाखवलेले डीजिटल आधार कार्डदेखील ओळख प्रमाणपत्र म्हणून ग्राह्य धरले जाते.

नव्या आधार अॅपमध्ये QR Code आधारित व्हेरिकफिकेशनचा पर्याय देण्यात आलेला आहे. त्यामुळे या तंत्रज्ञानाचा वापर करूनही संबंधित अधिकारी तुमची ओळख निश्चित करू शकतो. त्यामुळे घाबरून जाण्यची कोणतीही गरज नाही.