घरातले झुरळ तडफडून मरतील, फक्त या दोन गोष्टी वापरा अन् मग बघा चमत्कार!

घरात एकदा झुरळ झाले की त्यांचा नायनाट करणे सोपी बाब नसते. अनेक उपाय करूनही घरातील झुरळ काही जात नाहीत. परंतु तुम्ही एक रुपयाही खर्च न करता हा घरगुती उपाय करून पाहू शकता. यामुळे घरातील झुरळं निघून जातील.

| Updated on: Apr 04, 2026 | 5:16 PM
1 / 5
घरातील किचनमध्ये, बसिनमध्ये, अन्नाच्या कणावर तुम्ही अनेकदा झुरळं रेंगाळत असताना पाहिले असतील. या झुरळांमुळे तुम्हाला अनेक आजार होण्याची शक्यता असते. विशेष म्हणजे या झुरळांना पाहून महिला खूपच घाबरतात. त्यामुळेच महिलावर्ग झुरळांना घरातून कसे घालवायचे, याचा विचार करत असतात.

घरातील किचनमध्ये, बसिनमध्ये, अन्नाच्या कणावर तुम्ही अनेकदा झुरळं रेंगाळत असताना पाहिले असतील. या झुरळांमुळे तुम्हाला अनेक आजार होण्याची शक्यता असते. विशेष म्हणजे या झुरळांना पाहून महिला खूपच घाबरतात. त्यामुळेच महिलावर्ग झुरळांना घरातून कसे घालवायचे, याचा विचार करत असतात.

2 / 5

अनेकदा आपण बाजारातून अत्यंत महागडी औषधं आणतो. ही औषधं घरातील कोपऱ्यात, किचनमध्ये फवारतो. परंतु काही दिवसांनी परत सगळीकडे झुरळांचा सुळसुळाट पाहायला मिळतो. हा प्रकार वारंवार पाहायला मिळतो. यामुळे घरातील सदस्यांची खूपच चिडचिड होते.

3 / 5

परंतु एक रुपयाही खर्च न करता तुम्ही घरातील झुरळांचा नायनाट करू शकता. हे कसं शक्य आहे, ते जाणून घेऊ या. त्यासाठी तुमच्याकडे बेकिंग म्हणजेच खाण्याचा सोडा आणि लिंबू असणे गरजेचे आहे. या दोन गोष्टी असतील तर तुम्ही झुरळांचा कायमचा बंदोबस्त करू शकता.

4 / 5

एक लिटर पाणी उकळावे. त्यानंतर त्या पाण्यात दोन चम्मच बेकिंग सोडा टाकावा. यात एक किंवा दोन लिंबांचा रस टाकावा. त्यानंतर हे मिश्रण नंतर घराच्या बाेहेरील नाली, सिंकच्या खाली, सिंकच्या पाईपमध्ये टाकावे. त्यानंतर घरातील झुरळं तसेच इतर कीटकही बाहेर मरून जातील.

5 / 5

(टीप- या लेखातील सर्व माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. सविस्तर माहितीसाठी किंवा कोणताही प्रयोग करण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांशी संपर्क साधावा)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us