
ऋतिक रोशन हा सबा आझाद हिला डेट करतोय. गेल्या काही दिवसांमुळे सबा आझाद ही सोशल मीडियावर तूफान ट्रोल होतंय. एका व्हिडीओमुळे लोक तिला सतत खडेबोल सुनावत तिची खिल्ली उडवताना दिसत आहेत.

सबा आझाद सोशल मीडियावर ट्रोल होत असतानाच आता तिच्या सपोर्टसाठी ऋतिक रोशन हा मैदानात उतरलाय. ऋतिक रोशन याने एक व्हिडीओ इंस्टा स्टोरीवर शेअर केलाय. हा व्हिडीओ शेअर करत त्याने सबाचे काैतुक केले.

ऋतिक रोशन याने कॅप्शनमध्ये लिहिले की, ती शरण जाते, म्हणूनच ती चमकते...व्हिडीओमुळे सतत सबा आझाद हिला ट्रोल केले जात असतानाच ऋतिक रोशन याने तोच व्हिडीओ शेअर केलाय.

ऋतिक रोशन आणि सबा आझाद हे कायमच एकसोबत स्पाॅट होताना दिसतात. काही दिवसांपूर्वीच ऋतिक रोशन आणि सबा आझाद हे थेट विदेशात धमाल करताना दिसले.

मध्यंतरी चर्चा होती की, ऋतिक रोशन आणि सबा आझाद हे लवकरच लग्न करू शकतात. नेहमीच ऋतिक रोशन आणि आणि सबा आझाद हे एकमेकांचे खास फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसतात.