तुकाराम मुंढेंनी दिवाळीआधीच बॉम्ब फोडला; तब्बल 3 हजार 210 किलो…कारवाईची जोरदार चर्चा
तुकाराम मुंढे यांनी दिवाळीआधीच मोठी कारवाई केली आहे. मुंढे यांच्या विभागाने नाशिकमध्ये निकृष्ट दर्जाचा तेलसाठा जप्त केलाय.

तुकाराम मुंढे यांचा कारवाईचा धडाका सुरुच आहे. नाशिकमध्ये अन्न व औषध प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. सातपूर येथील पंकज ऑईल मिलवर धडक कारवाई करण्यात आली आहे.
विभागाने 3 हजार 210 किलो निकृष्ट दर्जाचा तेलसाठा जप्त केला आहे. रिफाइंड सोयाबीन ऑईलमध्ये भेसळ असल्याचा संशय व्यक्त केला आहे.
जप्त तेलसाठ्याची किंमत सुमारे 5 लाख 47 हजार रुपये इतकी आहे. नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांविरोधात प्रशासनाने कारवाई केली आहे.
अन्न सुरक्षा व मानके कायद्यांतर्गत कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर अन्नपदार्थांच्या गुणवत्तेची तपासणी मोहीम तीव्र करण्यात आली.
अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली. निकृष्ट अन्नपदार्थ विक्री करणाऱ्यांवर यापुढेही कारवाई सुरू राहणार असल्याचा इशारा अन्न व औषध प्रशासनाने दिला.